प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsmazya girlfriend sobat sex kartana baryach vela oral sex karnyachi eccha hote, pan ticya vagina madhun kadhi kadhi ambat prakaracha smell yeto. tyaveli oral sex karta yet nahi. tasa smell yeu naye mhanun kay karav lagel? plz answer..

1 उत्तर

स्त्रीच्या योनीमार्गामध्ये काही प्रकारचे स्राव तयार होत असतात. या स्रावांमुळे योनीमार्ग ओलसर राहतो, स्वच्छ राहतो, लैंगिक संबंधांच्या वेळी लिंगप्रवेश सोपा होतो आणि जंतुलागण होत नाही. पाळी चक्रामध्ये काही काळ हा स्राव जास्त प्रमाणात पाझरतो तर काही वेळा अजिबात पाझरत नाही. स्रावाला एक विशिष्ट असा नैसर्गिक वास असतो. कधी कधी काही जंतुलागण झाली असेल तर मात्र स्रावाचा वास बदलतो. योनीमार्गाची स्वच्छता ठेवली जात नसेल तरी आंबट वास येऊ शकतो. साध्या पाण्याने रोज योनीमार्ग धुतला तर स्वच्छ राहतो. खाज, जळजळ असेल तर काही जंतुलागण असू शकते. त्याची माहिती करून घेण्यासाठी पुढील लेख वाचा.
https://letstalksexuality.com/reproductive-tract-infections/
स्राव थांबवता येत नाहीत, ते नैसर्गिक आहेत आणि त्यांचं विशिष्ट काम आहे. मात्र त्यामागे काही जंतुलागण असेल ती मात्र निश्चित बरी करता येऊ शकेल. जोपर्यंत जंतुलागण जात नाही तोपर्यंत लैंगिक संबंध ठेऊ नका. ओरल सेक्स तर नक्कीच टाळा. कधी कधी दोन्ही जोडीदारांना उपचार घ्यावे लागतात.

आपले उत्तर प्रविष्ट करा

15 + 0 =