प्रश्नोत्तरेP24 test : Me exposure nantar 120 diwasani p24 test keli ahe ti negative ahe mla parat confirm karnyasathi test karavi lagel ka?

1 उत्तर
Answer for P24 test answered 6 years ago

हो.

तुम्ही एचआयव्ही होईल या भितीमध्ये आहात हे लक्षात येते आहे. आधी मनातली भिती बाजूला ठेवा,रिलॅक्स व्हा.

तुम्ही 120 दिवसांनी p24 antigen चाचणी केलीत. ही चाचणी negative आल्यास परत एकदा चाचणी करण्याचा सल्ला दिला जातो. कारण या चाचणीची 100% खात्री देता येत नाही. तुम्ही त्यानूसार Elisa test करुन घ्यावी. कारण ही चाचणी 95% अचूक निदान करते. अन तुम्ही या चाचणीतही negative आहात तर घाबरण्याचे कारण नाही आहे. तेव्हा डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने परत चाचणी करावी असे आम्ही सुचवू.

तेव्हा सध्या तरी काळजीचे काही दिसत नाही, तेव्हा भिती बाजूला ठेवा अन आनंंदी रहा. महत्वाचं म्हणजे कधीही निरोध शिवाय संभोग करु नका.

HIV/AIDS बाबत माहिती तुम्हाला व इतरांना ही सांगता यावी यासाठी एक लिंक सोबत देत आहे. नक्की वाचा

https://letstalksexuality.com/hiv_aids/

आपले उत्तर प्रविष्ट करा

12 + 16 =