सर्वात महत्वाचं म्हणजे गर्भधारणा झाली असेल तर पाळी येत नाही. त्याचं कारणही अगदी सोप्प आहे. मासिक पाळी येण्यापूर्वी गर्भाशयामध्ये गर्भाच्या वाढीसाठी आवश्यक अस्तर(लेयर) तयार होतं. जर गर्भधारणा झाली नाही तर हे रक्ताचं अस्तर गळून पडतं. या गळून पडण्याच्या प्रकियेला पाळी येणं म्हणतात. त्यामुळं हे नेहमी लक्षात ठेवा, गर्भधारणा झाल्यावर पाळी येणं बंद होतं.
(गर्भधारण नक्की कशी होते याबद्दल अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://letstalksexuality.com/conception/)
अगदी प्राथमिक तपासणी घरच्या घरी करता येऊ शकते. बाजारात उपलब्ध असलेल्या प्रेगनन्सी किटचा वापर करुन गर्भधारणा झाली आहे की नाही हे तपासता येऊ शकतं. मेडीकलच्या दुकानामध्ये अशी प्रेगनन्सी किट अंदाजे रु ५०/- पासून उपलब्ध असतात. या किटवर त्याच्या वापरासंदर्भात माहिती दिलेली असते. त्यानुसार तपासणी करा. जर तपासणी सकारात्मक(पॉजिटिव्ह) आली तर पुढील गोष्टींसाठी प्रत्यक्ष डॉक्टरांचा सल्ला फायदेशीर राहील.