सध्या बाजारात / पेपरात जाहिराती येत असतात लिंग वर्धक यंत्रा बद्दल नक्की ते काय आहे व त्याचा फायदा व तोटा काय ते कसे वा का वापरतात त्या बद्दल माहिती द्यावे कृपया
लिंगाच्या आकाराविषयी पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्येही अनेक गैरसमज असल्याचे दिसून येतात. सर्वसाधारपणे पुरुषाचे लिंग केवढे असावे? लिंग लहान असल्यास गर्भधारणेस काही अडचण येते का? लिंग वाकडे असल्याने काही अडचण येते का? लिंगाचा आकार लहान असल्याने लैंगिक सुखास बाधा येते का? लिंगाचा आकार वाढविण्यासाठी काही घरगुती उपाय आहे का? यासारख्या प्रश्नांच्या मुळातूनच अशा लिंगवर्धक यंत्र वैगेरे गोष्टींची निर्मिती केली गेली आहे. खरं तर निसर्गाने लिंगाचा आकार जसा दिलेला असतो त्यामुळे कोणत्याही प्रकारची लैंगिक सुखाला काही बाधा येत नाही. त्यामुळे अशा यंत्रांचा वापर करणं गरजेचे नाही वाटत. लिंगाचा आकार व लैंगिक सुख या विषयी अधिक माहितीसाठी पुढील लिंक पहा https://letstalksexuality.com/penis-size-doesnot-matter-in-sexual-satisfaction/