लैंगिक उत्तेजना निर्माण झाल्यानंतर, हस्तमैथुन किंवा लैंगिक संबंधांच्या वेळी पुरुषाच्या लिंगातून जो स्राव येतो त्याला वीर्य असे म्हणतात आणि स्त्रिच्या योनीतून जो स्राव येतो त्याला योनीस्राव म्हणतात. हे नैसर्गिक आहे.
संभोग करताना थोडे का होईना वीर्य योनिमधून बाहेर येणारंच. तुम्ही गर्भधारण्या होण्याच्या दृष्टीने काळजीमध्ये असाल तरी काळजी करण्याचं कारण नाही. गर्भधारणा होण्यासाठी वीर्यातील लाखो शुक्राणूंपैकी एकाचीच गरज असते. वीर्य बाहेर आल्याने गर्भधारणेमध्ये काहीच अडचण येत नाही. गर्भधारणा नक्की कशी होते हे जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.