precaution asked 7 years ago

me mazya gf sobt geli 2yrs month mdhun 1da as sex krtoy, pratyekweli me tila unwanted 72 dili ahe,ts mdhe 5month gap pn pdla hota,bt ata side effect hotil mhnun khich kel nahiye,sso jr amhala sex continue thevaycha asel tr konthi method safe rahil.condom use kel tr tich satisfaction hoil ka..plz guide me

1 उत्तर
Answer for precaution answered 7 years ago

१. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही unwanted 72 गोळीचा नियमित वापर थांबवण्याचा निर्णय घेतलात, हे खूप चांगले केलेत. स्त्रीच्या पाळीचक्राच्या जननक्षम काळात म्हणजे जेव्हा गर्भधारणा होऊ शकते अशा काळात जर गर्भनिरोधक न वापरता जर लैंगिक संबंध केले असतील किंवा निरोध वापरूनही तो फाटला किंवा फेल गेला तर गर्भधारणेची शक्यता असते. अशा वेळी असे संबंध आल्यानंतर ७२ तासाच्या आत जर या गोळ्या घेतल्या तर गर्भधारणा रोखता येऊ शकते. यांना मॉर्निंग आफ्टर पिल्स असंही म्हणतात. मात्र यांच्या नावाप्रमाणे या इमर्जन्सी असतानाच म्हणजेच जेव्हा दुसरा काही उपाय नाही तेव्हाच वापराव्यात. नियमित गर्भनिरोधक म्हणून याचा उपयोग करणं चांगलं नाही.

२. कंडोम हे एकदम सुरक्षित गर्भनिरोधक आहे शिवाय कंडोमच्या वापरामुळे लैंगिक संबंधांतून पसरणाऱ्या आजारांपासून देखील संरक्षण मिळते. बाजारामध्ये अनेक इतर कमी धोकादायक गर्भनिरोधके उपलब्ध आहेत त्यांचा वापर करावा. अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://letstalksexuality.com/contraception/

३. कंडोमच्या वापरामुळे लैंगिक समाधान मिळत नाही हा आपल्या समाजात सर्रास आढळणारा गैरसमज आहे आणि त्याला काहीही आधार नाही. स्त्रीला लैंगिक समाधान कसे मिळते हे अनेकदा आपल्या वेबसाईटवर चर्चिले आहे, ते वाचण्यासाठी खालील लिंकवरील प्रश्नोत्तरे वाचा.

https://letstalksexuality.com/question/

आपले उत्तर प्रविष्ट करा

14 + 8 =