माझ्या लग्नाला एक महिना झाला आहे आणि माझे मिस्टर pregnancy साठी तयार नाही आहेत 1 ते 1.5 वर्षे नको म्हणत आहेत. पण माझा प्रॉब्लेम असा आहे की माझ्या left side overay च ऑपरेशन झालं आहे आणि या ऑपरेशन बद्दल माझ्या मिस्टर ना काही माहिती नाही आहे. त्याचा काही माझ्या pregnancy वर प्रॉब्लेम होईल का? जर प्लॅनिंग केलं तर1 वर्षानंतर मी pregnant राहू शकेल का?
तुम्ही खरं तर हा प्रश्न ज्या डॉक्टरांनी हे ऑपरेशन केलेले आहे त्यांना विचारायला हवा की त्या ऑपरेशनमुळे गर्भधारणेला काही अडचण आहे की नाही. कारण ऑपरेशन करण्यामागे नक्की काय कारण होते त्यांना माहिती आहे . अन पुढे काय काळजी घ्यावी लागेल हे ही तेच सांगू शकतील.
राहिला प्रश्न तुमच्या कुटूंब नियोजनाचा… तर हे आधी लक्षात घ्या की, जे काही आहे ते मोकळेपणाने तुमच्या पतीला सांगा. कारण हा तुमच्या कुटूंबाचा प्रश्न आहे अन याचे उत्तर दोघांनी सोडवल्यास अधिक उत्तम.
गर्भनिरोधनाचे बरेच पर्याय आहेत. सोबत लिंक दिलेली आहे. https://letstalksexuality.com/contraception/
यापैकी काही पर्यायांचा विचार करु शकता. यामध्ये कमी कालावधीसाठी तोंडावाटे घेण्याच्या संप्रेरक गोळ्या आहेत किंवा एकदम सोप्पा मार्ग म्हणजे निरोधचा वापर.