Pregnancy-related asked 5 years ago

sir mazya baykola aaj 29 divas zalet MC aaleli nahi ajun. UPT keli pn negative diste tr ky pregnancy asu shakte ka sir?

kinva ky karave ajun ?

1 उत्तर
Answer for Pregnancy-related answered 5 years ago

तुम्ही प्रेग्नंसी कीट योग्य पद्धतीने वापरत आहात का ? याची एकदा खात्री करा. आवश्यकता वाटल्यास स्त्रीरोग तज्ञांकडून खात्री करून घ्या. गरोदरपणाव्यतिरिक्त पाळी चुकण्याची किंवा लांबण्याची इतरही अनेक कारणं आहेत. ताण-तणाव, वजन कमी असणे, अत्याधिक व्यायाम, खूप कष्टाची कामं, अत्याधिक प्रवास, कुपोषण किंवा स्त्रीच्या शरीरात बीज निर्मिती आणि पाळीचक्रावर प्रभाव टाकणाऱ्या काही विशिष्ट संप्रेरकांशी (हार्मोन्स) संबंधित समस्या अशी अनेक कारणं पाळी वेळेवर न येण्याला कारणीभूत असू शकतात.

जरी गर्भधारणा झाली तरी भारतामध्ये २० आठवड्यापर्यंत गर्भपात करण्याला कायद्याने मान्यता आहे. त्यातही १२ व्या आठवड्यापर्यंत केलेला गर्भपात सुरक्षित मानला जातो. त्यामुळे अजून थोडं थांबा अन पाळीची वाट पाहा. जर पाळी नाहीच आली तर पुन्हा UPT करून पहा. जर UPT पुन्हा निगेटिव्ह आलीच तर मात्र डॉक्टरांना भेटून घ्या. टेन्शन घेण्याचं कारण नाही. मात्र पाळी नियमित न येण्याचं कारण शोधणं गरजेचं असतं. तत्काळ एखाद्या डॉक्टरचा सल्ला घ्या.

अधिक माहितीसाठी – https://letstalksexuality.com/menstrual-and-fertilitycycle/ आणि https://letstalksexuality.com/menstrual-cycle-length/ हे वाचा.

आपले उत्तर प्रविष्ट करा

10 + 12 =