तुमचे उत्तर देण्यास उशीर झाला त्याबद्दल माफ करा. सर्वसाधारणपणे अपेक्षित तारखेला मासिक पाळी आली नाही आणि गर्भधारणेसाठी पूरक काळात लैंगिक संबंध आले असतील तर प्रेग्नन्सी टेस्ट केली जाते. तुम्हाला तोपर्यंत वाट बघायची नसेल आणि तुम्ही गरोदर असण्याची शक्यता वाटत असेल तर संबंध आल्यापासून १ ते २ आठवड्याच्या काळात ही टेस्ट करू शकता. या टेस्टवर पूर्णपणे अवलंबून न राहता एकदा स्त्रीरोग तज्ञांकडून तपासणी करून घेणे कधीही चांगले.
तुम्ही गरोदर असाल आणि मुल नको असेल तर घाबरून जाऊ नका आणि कृपया फक्त आणि फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानेच गर्भपात करा. भारतामध्ये पहिल्या २० आठवड्यांपर्यंतचा गर्भपात सुरक्षित आहे. पहिल्या 12 आठवड्यात म्हणजेच गर्भधारणा झाल्यापासून पहिले तीन महिने गर्भपात सुरक्षित असतो. त्यामुळे गर्भपात करायचा असल्यास तसा निर्णय लवकर घेणं आणि शक्यतो पहिल्या तीन महिन्यात गर्भपात करून घेणं आरोग्याच्या दृष्टीने चांगलं आहे. 12 आठवडे उलटून गेले असतील तर दोन डॉक्टरांच्या संमतीने गर्भपात करून घेता येतो. गर्भपात नोंदणीकृत दवाखान्यामध्येच करून घ्या. 20 आठवड्यांनंतर गर्भपात कायदेशीर नाही. त्यामुळे जास्त वेळ न दवडता गर्भपाताचा निर्णय शक्यतो लवकर घ्या. अधिक माहितीसाठी खालील लिंकवरील लेख वाचा.
https://letstalksexuality.com/abortion/
गर्भपाताबद्दल आणखी काही माहिती हवी असेल तर या 9075 764 763 हेल्पलाईनवर फोन करा.
मर्जी हेल्पलाइन – सोमवार ते शुक्रवार, सकाळी 10 ते सायंकाळी 6 फोन- 9075 764 763