आपल्याकडं अनेकांना स्त्रियांमध्ये मूत्रमार्ग आणि योनीमार्ग हे दोन वेगवेगळे मार्ग असतात हे माहित नसतं. योनीमार्गातून मासिक पाळीचं रक्त बाहेर येतं तसेच समागमाच्या वेळी पुरुषाचं लिंग किंवा शिश्न इथूनच आत जातं आणि बाळाचा जन्मही याच वाटेनं होतो. सेक्स केल्यावर लघवी केली किंवा मूत्रमार्ग किंवा योनीमार्ग धुतला किंवा अंघोळ केली तरी देखील गर्भधारणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे गर्भधारणा नको असेल तर योग्य त्या गर्भनिरोधकाचा वापर हाच एकमेव आणि सुरक्षित मार्ग आहे. नको असणारी गर्भधारणा टाळणं ही स्त्री आणि पुरुष दोघांची जबाबदारी आहे. त्यामुळे लैंगिक संबंधांबरोबर गर्भनिरोधनामध्येही स्त्रीप्रमाणे पुरुषाचा तितकाच सहभाग असायला पाहिजे.
गर्भनिरोधकांविषयी अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा. https://letstalksexuality.com/contraception/