गर्भधारणा होण्यासाठी सर्वात महत्वाची प्रक्रिया म्हणजे स्त्रीच्या शरीरातील अंडोत्सर्जन. मासिक येण्याच्या साधरण १२ ते १६ आगोदर अंडोत्सर्जन होत असतं. याला स्त्रीबीज असंही म्हणतात. स्त्रीबीज १२ ते २४ तास बीजनलिकेत जिवंत असतं. जर याच काळात पुरुषाच्या शुक्राणूसोबत मिलन झाले तर गर्भ रुजण्याची शक्यता वाढते.
यातला सर्वात महत्वाचा भाग म्हणजे, मासिक पाळीचं चक्र तुम्हाला ओळखता यायला पाहिजे. प्रत्येक स्त्रीचं मासिक पाळी चक्र वेगळं असतं. काही मुलींना मासिक पाळी दर २२ दिवसांनी येते तर काही मुलींना दर ४० दिवसांनी येते. जर तुम्ही मासिक पाळी चक्र ओळखू लागला की मग पाळी येण्याच्या १२ ते १६ दिवस आगोदर अंडोत्सर्जन होत हे लक्षात ठेवा. कदाचित मानसिक तणाव, प्रवास, आजारपण यामुळं पाळीचक्र मागेपुढे होवू शकतं
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.