स्त्रीच्या पाळीचक्राच्या जननक्षम काळात म्हणजेच जेव्हा गर्भधारणा होऊ शकते अशा काळात जर गर्भनिरोधक न वापरता लैंगिक संबंध केले असतील किंवा निरोध वापरूनही तो फाटला किंवा फेल गेला तर गर्भधारणेची शक्यता असते. स्त्रीच्या पाळीचक्राच्या जननक्षम काळ ओळखण्यासाठी https://letstalksexuality.com/conception/ या लिंक वरील लेख नक्की वाचा. पाळीची तारीख उलटून जर आठवडा झाला असेल तर गर्भधारणा झाली आहे की नाही याची खात्री करणे आवश्यक आहे. प्रेग्नन्सी टेस्ट करण्यासाठीची किट बाजारात मिळतात. त्यावरील सूचनांप्रमाणे लघवीची तपासणी केली तर दिवस गेले आहेत की नाही हे समजू शकेल. जर टेस्ट निगेटिव्ह असेल तर थोडे दिवस पाळीची वाट बघावी (मसिक पाळीचे चक्र नियमित असेल). पॉसिटीव्ह असेल तर तर स्त्रीरोगतज्ज्ञांना भेटून तपासणी करता येईल. प्रेगा टेस्ट केल्यानंतरही डॉक्टर कडून प्रेग्नंसी कन्फर्म केलेली कधीही चांगले. अधिक माहितीसाठी खालील लिंकवरील लेख आवर्जून वाचा.
https://letstalksexuality.com/category/our-bodies/
https://letstalksexuality.com/category/talking-about-sex/
1 उत्तर
आपले उत्तर प्रविष्ट करा