problem asked 7 years ago

hi aamacha laganala 2 year zalet..but maze mr che ling kadak ch hot nhi…tyamule te insert hot nhi aat…dr.ni report sagale normal ahet..ky katu plz sanga…

1 उत्तर
Answer for problem answered 7 years ago

हो, ही एक समस्या आहे. त्यामागे अनेक कारणं असू शकतात. लैंगिक उत्तेजना मिळाल्यामुळे मेंदू रक्ताचा प्रवाह लिंगाच्या दिशेने वाढवतो आणि त्या प्रवाहाच्या दाबामुळे लिंगात ताठरता येते. या प्रक्रियेवर त्या त्या व्यक्तीचं शारीरिक स्वास्थ्य, मनस्वास्थ्य, वय इत्यादीचा प्रभाव असतो. शारीरिक आणि मानसिक अस्वास्थ्य असेल, ताणताणाव असतील तर अशा स्थितीतही शरीर संबंधांप्रति अनिच्छा, अल्पकालीन ताठरता अशा स्थितीचा सामना करावा लागतो. लिंग शिथिलतेचा प्रश्न हा अनेक पुरुषांना भेडसावत असतो.त्याचा परिणाम नियमित आणि सुखकारक शरीर संबंधांवर तर होतोच शिवाय गर्भधारणेत त्यामुळे अडथळा येतो.

अशा समस्येवर कोणाशी बोलणंही अवघड होऊन बसतं. त्यात बायांसाठी तर हे अधिक कठीन होऊन बसतं. मी म्हणेन योग्य वैद्यकीय मदत घ्या. तुमच्या जवळच्या एखद्या सेक्सॉलॉजिस्टचा सल्ला घ्या. काही वेळा औषधांचा उपयोग यावर होऊ शकतो. न घाबरता आणि न लाजता आपली समस्या डॉक्टरांना सांगा. दोन्ही जोडीदारांनी एकमेकांना समजून घेतलं, सेक्स सोडून एरवीही जवळीक वाढवली, धीर दिला तर त्याचा परिणाम निश्चित चांगला होऊ शकेल.

अधिक माहितीसाठी खाली काही लिंक्स देत आहे. त्या वाचा. ऑल दि बेस्ट.

https://letstalksexuality.com/premature-ejaculation/

https://letstalksexuality.com/question/sir-mala-lingat-tatharta-yet-nahi-kay-karu/

आपले उत्तर प्रविष्ट करा

16 + 14 =