ज्या व्यक्तीसोबत लैंगिक संबंध आले आहेत त्या व्यक्तीला एड्स नसेल अशा व्यक्तीसोबत लैंगिक संबंध आले तर एच. आय. व्ही होत नाही. मात्र ज्या व्यक्तीला एच. आय. व्ही./ एड्स आहे अशा एकाजरी व्यक्तीसोबत असुरक्षित लैंगिक संबध आला तर एच. आय. व्ही होऊ शकतो. समोरच्या व्यक्तीला एच. आय. व्ही./ एड्स आहे की नाही हे ओळखण्याचा एच. आय. व्ही. टेस्ट व्यतिरिक्त इतर कोणताही मार्ग नाही. म्हणूनच जास्त व्यक्तींशी असुरक्षित लैंगिक संबध ठेवले तर लैंगिक संबंधातून पसरणारे आजार पसरण्याची शक्यता असते. एच. आय. व्ही./ एड्स विषयी अधिक माहितीसाठी खालील लिंकवरील लेख वाचा.
https://letstalksexuality.com/hiv_aids/
मुखमैथुन आणि गुदमैथुन करताना कंडोमचा वापर- समोरच्या व्यक्तीला एच. आय. व्ही किंवा इतर लिंगसांसर्गिक आजार असतील तर ते होऊ नयेत म्हणून कंडोमचा वापर आवश्यक आहे.