प्रश्नोत्तरेमासिक पाळी येण्याआधी किंवा आल्यानंतर किती दिवस सम्भोग करू नये?
1 उत्तर

तुम्ही विचारता त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आधी तुमचं पाळी चक्र किती दिवसांचं आहे हे समजून घ्यायला पाहिजे. पाळीचक्राची लांबी, अंडोत्सर्जन नेमकं कधी होतं यावर हा काळ अवलंबून असतो. तुमचं पाळी चक्र जर 30 दिवसांंचं असेल म्हणजेच दर एक महिन्याने पाळी येत असेल तर साधारणपणे पाळी सुरु झाल्यापासून साधारणपणे १५-१६ व्या दिवशी अंडोत्सर्जन होण्याची शक्यता आहे. त्याच्या आधी चार दिवस आणि नंतर चार दिवस म्हणजेच पाळी सुरू झाल्यापासून १२ व्या ते २० व्या दिवसापर्यंत गर्भधारणा होण्याची शक्यता असते. त्यामुळे या काळात संभोग टाळावा किंवा निरोध आणि इतर शुक्राणूनाशक गोळ्यांचा वापर करावा.
पण पाळी चक्र जर लहान असेल तर पाळी सुरू झाल्यापासून अगदी ७ व्या दिवशीसुद्धा अंडोत्सर्जन होऊ शकतं. त्यामुळे आधी स्वतःच्या पाळीचक्राचा नीट अभ्यास करा आणि त्यानंतरच अंडोत्सर्जनाचा काळ ओळखता येईल. तोपर्यंत निरोध वापरणं कधीही उत्तम.
अधिक माहितीसाठी पुढील लेख वाचा
https://letstalksexuality.com/menstrual-and-fertility-cycle/

आपले उत्तर प्रविष्ट करा

11 + 3 =

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी