eMaz nav Raj, age 25 mi TCS Hyderabad madhe job karto.MI aani mazi gf aamhi nehmi sefe sex karto. Hi mazi dusari gf. Pehlya gf sobat pn sex keloy aamhi nehmi ekmekacha samtine sex karayacho., kadhihi tine kivha mi ekmekana sex problem kivha sex organs baddal problem navat, nehmi sex aandan anubhaval.Pn aatachi ji gf aahe ti nehmi sex changla karto tu orgasm cha अनुभव pn mala bhetato pn maza penis size vr tila तक्रार aahe mhnate ki tila 6inch ch pahije.. Tu kahihi karun enlarge karun ghe.. Maze penis size 5\\’5 aahe.Mi vachalay penis enlargement baddal pn mala कारायचा nahiye. Tr mi kai karu?Mahiti dyvi. First gf la maza penis size problem navat. Pn dusarya gf aahe.. As ka?

1 उत्तर
Answer for Sex answered 7 years ago

मित्रा, पुरुष म्हणून जी कामगिरी बजावण्याचं दडपण पुरुषांवर असते, त्यात लैंगिक ‘काम’ गिरीचा भागही असतो. ब्लू फिल्म्सच्या, इंटरनेटच्या माध्यमातून सेक्स चुकीच्या कल्पना पद्धतशीरपणे पुरुषावर बिंबवल्या जातात. लैंगिकतेविषयीचं अपूर्ण वा अर्धवट ज्ञान, अनेक गैरसमजुती यामुळे अनेक पुरुषांमध्ये न्यूनगंड दडलेला असतो. लिंगाच्या आकाराविषयी पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्येही अनेक गैरसमज असल्याचे दिसून येते. सर्वसाधारपणे पुरुषाचे लिंग केवढे असावे? लिंग लहान असल्यास गर्भधारणेस काही अडचण येते का? लिंग वाकडे असल्याने काही अडचण येते का? लिंगाचा आकार लहान असल्याने लैंगिक सुखास बाधा येते का? लिंगाचा आकार वाढविण्यासाठी काही घरगुती उपाय आहे का? यांसारखे अनेक प्रश्न आपल्या वेबसाईटवर विचारले गेले आहेत.

लिंगाचा आकार केवढा असावा याचा काही विशिष्ट मापदंड नाही. प्रत्येक पुरुषाच्या उत्तेजित लिंगाची लांबी आणि जाडी वेगवेगळी असते. उदा. काहींचं ४ इंच, काहींचं ५ इंच तर काहींचं ६ इंच. साधारणपणे लिंग ताठ झाल्यावर त्याची लांबी ७ ते १७ (४-५ इंच) सेंटीमीटर एवढी असू शकते. लिंग किती मोठं आहे यापेक्षा ते ताठ होतं का, संबंधाच्या वेळी ते ताठ राहतं का किंवा लैंगिक सुख मिळतं का, तुमच्या जोडीदाराला तुम्ही लैंगिक सुख मिळवून देऊ शकता का हे जास्त महत्त्वाचं आहे. उत्तेजित लिंग जर २ इंचांपेक्षा कमी असेल तर ही समस्या असू शकते यासाठी योग्य त्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागतो.

लिंगाचा आकार, लांबी आणि लैंगिक समाधान याचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. उत्तेजित लिंग जर दोन इंच किंवा त्यापेक्षा मोठे असेल तर लैंगिक सुखामध्ये कसलीही अडचण येत नाही. अनेक पुरुषांमध्ये आपल्या लिंगाची लांबी पुरेशी आहे का? आपण जोडीदाराला पूर्ण लैंगिक सुख देऊ शकतो का? याविषयी असुरक्षितता असते. बहुतेक वेळा मर्दानगी आणि जोडीदाराचे समाधान करण्याची क्षमता यांचा संबध लिंगाचा आकार आणि लांबी यांच्याशी लावतात. पण हा गैरसमज आहे. सेक्स मध्ये लिंगाचा आकार नाही तर आनंद महत्वाचा असतो. सेक्समध्ये प्रत्यक्ष संभोगाबरोबरच प्रणय, स्पर्श, शारीरिक जवळीक आणि संभोग अशा विविध प्रकारच्या लैंगिक क्रियांचा समावेश होतो. यातून जोडीदार परस्परांना आनंद देऊ शकतात.

आता Penis Inlargement विषयी बोलूयात.

लिंगाची जाडी आणि लांबी वाढवण्यासाठी घरगुती उपाय किंवा शास्त्रीय कसोट्यांवर उतरलेले एकही औषध बाजारात उपलब्ध नाही. कसोटीस न उतरलेले हे उपाय अनेकदा भोंदू वैद्यांकडून किंवा बोगस औषध कंपन्यांकडून सुचविले जाण्याची शक्यता असते. खरंतर हे उपाय उपयुक्त ठरण्याऐवजी अपायकारक ठरू शकतात. जर उत्तेजित म्हणजेच ताठ लिंग जर दोन इंचापेक्षा मोठे असेल तर लिंगाची जाडी किंवा लांबी कशाला वाढवायची. नाही का ?

थोडक्यात काय तर, ‘आकार नाही तर आनंद महत्त्वाचा !’

या सर्व मुद्द्यांना घेऊन तू तुझ्या मैत्रिणीशी मनमोकळेपणाने बोल. लिंगाच्या आकाराविषयी समाजात असलेल्या गैरसमजुती सांग. तसेच लिंगाच्या लांबीचा आणि लैगिक समाधान यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही हे लक्षात आणून दे.

तुमच्या दोघांसाठी खाली एका लेखाची लिंक देत आहे, ती नक्की वाचा.

https://letstalksexuality.com/penis-size-doesnot-matter-in-sexual-satisfaction/

आपले उत्तर प्रविष्ट करा

13 + 19 =