प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsप्रणयाचे टप्पे

1) sex ( संभोग) kasa krava mhnje survat pasun shevt paryant kay krave jyamule dogh hi amhi trupt hou??

2) sex ha kiti vel karava jyamule tila v mla parmochh sukhacha bindu gathata yeil.???

3) संभोग व प्रणय ya mde farak konta v ksa??

plz mla sarvanche uttar dyal.
karan hya goshti mi konalach vicharu shakt nahi.

mi ya (let’s talk sexuality) website che v khas krun tumche khup aabhar manto

1 उत्तर

तुम्हाला या वेबसाइटवरील माहिती आवडली हे सांगितल्याबद्दल तुमचे सर्वप्रथम आभार. ज्या गोष्टी फार मोकळेपणाने बोलल्या जात नाहीत त्या बोलता याव्यात, लैगिकतेविषयी (फक्त लैगिक संबंधांविषयी नाही) माहिती करून घ्यावी आणि त्यातली मूल्यं समजून घ्यावीत हाच या साइटचा मुख्य उद्देश आहे. 
सेक्स किंवा लैंगिक संबंधांबद्दल माहिती करून घेणं उपयोगी आहे. मात्र शेवटी आपल्याला, आपल्या जोडीदाराला काय आवडतं, कशाचा त्रास होतो, काय आवडत नाही, हे आपणच शोधून काढायला पाहिजे. तसंच किती वेळा आणि किती वेळ सेक्स केला की आनंद मिळेल हेही तुम्हा दोघांवर अवलंबून आहे. ते इतर कुणी सांगू शकणार नाही. 
एक मात्र आवर्जून लक्षात घ्या. सेक्समध्ये किती आनंद मिळतो हे फक्त तुम्ही सेक्स कसं करता यावर अवलंबून नाही. ती केवळ शरीराने करण्याची कृती नाही. तुमचा एकमेकांशी संवाद आहे का, एकमेकांबद्दल ओढ आहे का आणि मुळात तुम्ही एरवीही एकमेकांबरोबर आनंदात असता का या सर्वांचा सेक्सवर आणि त्यातून मिळणाऱ्या आनंदावर परिणाम होत असतो. त्यामुळे एरवीही आपल्याला कशात सुख मिळतं, कशाने आपल्याला आणि आपल्या जोडीदाराला छान वाटतं तेही शोधून काढा आणि त्याही गोष्टी तितक्याच उत्साहाने करा. 
तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं या पुढील लेखांमध्ये आहेत. ते दोन्ही लेख वाचा आणि समजून घ्या. तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा.
https://letstalksexuality.com/what-is-sex/

https://letstalksexuality.com/orgasm/ 

Manshri rohan pawar replied 8 years ago

Nice

I सोच replied 8 years ago

धन्यवाद… वेबसाईट वरील इतर लेख आणि प्रश्नोत्तरे नक्की वाचा…

आपले उत्तर प्रविष्ट करा

7 + 5 =