योनीमार्ग लवचिक असतो त्यामुळे लग्नाआधी काय किंवा नंतर काय, अनेकदा (नेमके किती वेळा हे सांगणं अवघड आहे) लैंगिक संबध आले तर योनी पूर्वीपेक्षा थोडी सैल पडू शकते. मात्र यामुळे काही अडचण येत नाही. हे अगदी स्वाभाविक आहे. यात काळजी करण्याचं कारण नाही.
तुमच्या मनात कौमार्य किंवा लग्ना आधीचे लैंगिक संबंध याविषयी काही गैरसमज असतील तर त्याविषयी आपल्या वेबसाईट वर काही लेख आणि प्रश्नोत्तरे देखील चर्चिली आहेत. ती नक्की वाचा.
https://letstalksexuality.com/virginity/
https://letstalksexuality.com/sex-before-marriage/
प्रश्नोत्तरे :- https://letstalksexuality.com/question/