संभोग करताना स्त्री आणि पुरुष दोघांच्याही लिंगामधून पारदर्शक चिकट असा स्त्राव येत असतो. याला वंगण म्हणता येईल. लैंगिक भावना उद्द्यपित झाल्यानंतर संभोग करण्यासाठी अशा वंगणाची आवश्यकता असते. याव्यतिरिक्त जो पांढरा स्त्राव स्त्रीच्या योनीतून येत असतो त्याला व्हाईट डिस्चार्ज(पांढरं जाणं) म्हणतात. योनीमार्गातील किटाणू बाहेर टाकण्यासाठी शरीर स्वतः काही स्त्राव सतत योनीमधून बाहेर सोडत असतो. यात घाबरण्यासारखं काही नाही.
जर पुरुषांच्या योगी स्त्रीच्या तोंडात गेल तर बाल किवा एडस होउ शकतो का?
स्त्रीच्या लैंगिक अवयवाला योनी तर पुरुषाच्या लैंगिक अवयवाला लिंग असे म्हणतात. स्त्री पुरुष दोघांनाही स्वतःच्या आणि एकमेकांच्या शरीराविषयी माहिती असणे आवश्यक आहे. खालील सेक्शन नक्की वाचा.
https://letstalksexuality.com/category/our-bodies/
आता वळूयात तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडे. वीर्य तोंडावाटे पोटात गेल्यास गर्भधारणा होत नाही. गर्भधारणा होण्यासाठी वीर्य गर्भाशयात पोचावं लागतं आणि ते फक्त योनीमार्गातूनच जाऊ शकतं. वीर्य तोंडातून पोटात गेल्यास ते गर्भाशयात पोचणार नाही आणि त्यामुळे त्यातून गर्भधारणा होणार नाही. गर्भधारणा नक्की कशी होते हे जाणून घेण्यासाठी खालील लिंकवरील लेख नक्की वाचा. https://letstalksexuality.com/conception/
जोडीदारांनी एकमेकांच्या लैंगिक अवयवांना जिभेने चाटणे अथवा लिंग तोंडात घेणे याला मुखमैथुन असं म्हणतात. जर दोन्ही जोडीदारांची इच्छा असेल, दोघांनाही त्यातून आनंद मिळत असेल तर त्यात गैर काही नाही. मात्र मुखमैथुन करताना योनीचा भाग स्वच्छ असायला हवा. योनीमार्गामध्ये कधी कधी जंतुसंसर्ग होण्याची शक्यता असते. असा काही जंतुसंसर्ग झाला असेल तर त्यावर उपाय करावा. अशा वेळी मुखमैथुन करू नये. काही जणांना मुखमैथुन करणे किळसवाणे वाटू शकते. त्यामुळे दोन्ही जोडीदारांना यातून आनंद मिळतोय का याचा विचार करणे आवश्यक आहे. योनीतील स्राव शरीरात गेला तरी त्याने काहीही धोका पोहचत नाही.
मुखमैथुनामध्ये एच.आय.व्ही. होण्याची शक्यता खूप कमी असते. तोंडामध्ये जखमा असल्या तर संसर्ग होण्याची शक्यता असू शकते. म्हणूनच मुखमैथुन करताना कंडोम (निरोध) वापरणे कधीही चांगले.
मुखमैथुनाविषयी आणखी थोडे जाणून घेऊयात. जोडीदारांनी एकमेकांच्या लैंगिक अवयवांना जिभेने चाटणे अथवा लिंग तोंडात घेणे याला मुखमैथुन असं म्हणतात. जर दोन्ही जोडीदारांची इच्छा असेल, दोघांनाही त्यातून आनंद मिळत असेल तर त्यात गैर काही नाही. मात्र मुखमैथुन करताना योनीचा भाग स्वच्छ असायला हवा. योनीमार्गामध्ये कधी कधी जंतुसंसर्ग होण्याची शक्यता असते. असा काही जंतुसंसर्ग झाला असेल तर त्यावर उपाय करावा. अशा वेळी मुखमैथुन करू नये. काही जणांना मुखमैथुन करणे किळसवाणे वाटू शकते. त्यामुळे दोन्ही जोडीदारांना यातून आनंद मिळतोय का याचा विचार करणे आवश्यक आहे. योनीतील स्राव शरीरात गेला तरी त्याने काहीही धोका पोहचत नाही.