प्रश्नोत्तरेCategory: Public Questionssex kel pan piredcha kalavadhi yeun pired ale nahi tr kay samjav ani te jar thevaych nasel tr Kay upay karave

1 उत्तर

प्रेग्नंसी कीटच्या सहाय्याने प्रेग्नंसी टेस्ट करा. प्रेग्नंसी असेल आणि मूल नको असेल तर वैद्यकीय सल्ला घेऊन गर्भपात करणे हाच एकमेव सुरक्षित पर्याय आहे. कुठल्याही सरकार मान्य गर्भपात केंद्रात तुम्हाला ही सेवा मिळायला हवी. कृपया वैद्यकीय सल्ल्याशिवाय इतर कोणीही सुचविलेली गोळ्या, औषधे किंवा इतर घरगुती उपाय करू नका. अशा उपायांनी खात्रीशीर गर्भपात होण्याची शक्यता कमी असते शिवाय त्याचे तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतात.

भारतामध्ये 20 आठवड्यांपर्यंतचा गर्भपात कायदेशीर आहे.

पहिल्या 12 आठवड्यात म्हणजेच गर्भधारणा झाल्यापासून पहिले तीन महिने गर्भपात सुरक्षित असतो. त्यामुळे गर्भपात करायचा असल्यास तसा निर्णय लवकर घेणं आणि शक्यतो पहिल्या तीन महिन्यात गर्भपात करून घेणं आरोग्याच्या दृष्टीने चांगलं आहे. 12 आठवडे उलटून गेले असतील तर दोन डॉक्टरांच्या संमतीने गर्भपात करून घेता येतो.

गर्भपात नोंदणीकृत दवाखान्यामध्येच करून घ्या. 20 आठवड्यांनंतर गर्भपात कायदेशीर नाही. त्यामुळे जास्त वेळ न दवडता गर्भपाताचा निर्णय शक्यतो लवकर घ्या. अधिक माहितीसाठी खालील लिंकवरील लेख वाचा.

https://letstalksexuality.com/abortion/

गर्भपाताबद्दल आणखी काही माहिती हवी असेल तर या 9075 764 763 हेल्पलाईनवर फोन करा.

मर्जी हेल्पलाइन – सोमवार ते शुक्रवार, सकाळी 10 ते सायंकाळी 6 फोन- 9075 764 763

https://letstalksexuality.com/helpline-abortion/

सर्वात महत्वाचे म्हणजे नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी कंडोमचा वापर हा एक सुरक्षित पर्याय आहे.

आपले उत्तर प्रविष्ट करा

1 + 8 =