हे सील ऑन- ऑफ होणं असं काही नसतं. स्त्रीच्या लैंगिकतेवर नियंत्रण ठेवण्याच्या पुरुषप्रधान मानसिकतेतून आलेला हा गैरसमज आहे. स्त्रीच्या योनीमार्गात हायमेन नावाचा लवचिक पडदा असतो. बऱ्याचदा या पडद्याचा संबंध स्त्रीच्या कौमार्याशी लावला जातो. पहिल्या शरीर संबंधांच्या वेळेस रक्त आले तरच स्त्री कुमारी असे मानले जाते. हा खूप मोठा गैरसमज आहे. स्त्रीच्या लैंगिकतेवर नियंत्रण ठेवण्याच्या पुरुषप्रधान मानसिकतेतून आलेला हा गैरसमज आहे. योनिमार्गातील हा पडदा सायकल चालवणं, खेळ, पोहणं, कष्टाची कामं अशा इतरही कारणांनीही फाटू शकतो. त्यामुळे प्रत्येक मुलीच्या योनीमार्गात हा पडदा असतोच असं नाही आणि तो पहिल्या सेक्सच्या वेळी फाटून रक्त येतंच असं नाही.
कौमार्य किंवा वर्जिनिटी ही फार मजेशीर कल्पना आहे. तुमच्या मनात कौमार्य किंवा लग्ना आधीचे लैंगिक संबंध याविषयी काही गैरसमज असतील तर त्याविषयी आपल्या वेबसाईट वर काही लेख आणि प्रश्नोत्तरे देखील चर्चिली आहेत. ती नक्की वाचा.
https://letstalksexuality.com/virginity/
https://letstalksexuality.com/sex-before-marriage/
प्रश्नोत्तरे :- https://letstalksexuality.com/question/