प्रश्नोत्तरेCategory: Private Questionsex kelyawr unwanted 72 dili ahe

2 उत्तर

स्त्रीच्या पाळीचक्राच्या जननक्षम काळात म्हणजे जेव्हा गर्भधारणा होऊ शकते अशा काळात जर गर्भनिरोधक न वापरता जर लैंगिक संबंध केले असतील किंवा निरोध वापरूनही तो फाटला किंवा फेल गेला तर गर्भधारणेची शक्यता असते. अशा वेळी असे संबंध आल्यानंतर 72 तासाच्या आत जर या गोळ्या घेतल्या तर गर्भधारणा रोखता येऊ शकते. यांना मॉर्निंग आफ्टर पिल्स असंही म्हणतात. मात्र यांच्या नावाप्रमाणे या इमर्जन्सी असतानाच म्हणजेच जेव्हा दुसरा काही उपाय नाही तेव्हाच वापराव्यात. नियमित गर्भनिरोधक म्हणून याचा उपयोग करणं चांगलं नाही.

गर्भनिरोधनाच्या अनेक पध्दतींपैकी इमर्जन्सी पील्स (गोळ्या) घेऊन गर्भधारणा होण्यापासून थांबवता येऊ शकतं. परंतू या गोळ्या नियमित स्वरुपात घेऊ नये असा सल्ला अनेकवेळा दिला जातो. याचं महत्वाचं कारण म्हणजे, या गोळ्या शरीरातील संप्रेरकांना(हार्मोन्सला) प्रभावित करतात. म्हणजे नैसर्गिकरित्या हार्मोन्समध्ये होणार्‍या बदलामध्ये कृत्रिम अडथळा निर्माण करतात. यामुळं तात्पुरत्या स्वरुपात डोकेदुखी, मळमळणं, उलटी होणं, स्तनांमध्ये दुखणं इत्यादी किंवा मासिक पाळीच्या तारखा मागे-पुढे जाणं असे परिणाम दिसू शकतात. या गोळ्य़ा नियमित स्वरुपात घेतल्यामुळं भविष्यातील गर्भधारणेवर परिणाम होऊ शकतो. शिवाय मासिक चक्रावर याचा विपरित परिणाम होऊ शकतो. यांच्या नावाप्रमाणे या इमर्जन्सी असतानाच म्हणजेच जेव्हा दुसरा काही उपाय नाही तेव्हाच वापराव्यात.

आणखी एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की, गर्भनिरोधन करणे ही फक्त स्त्रीची जबाबदारी नाही. कंडोम हे पुरुषांसाठी सहज उपलब्ध असलेले आणि अगदी सहजा सहजी वापरता येणारे गर्भनिरोधक उपलब्ध आहे. परस्पर संमतीने गर्भनिरोधक वापरणे कधीही योग्य.

गर्भनिरोधकांविषयी अधिक माहितीसाठी खालील लिंकवरील माहिती वाचा.

https://letstalksexuality.com/contraception/

आपले उत्तर प्रविष्ट करा

1 + 2 =

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी