Sex problem asked 7 years ago

Sir majh naav nishant asun me 26 varshacha aaho tari mala me 12 varshacha astana mala laigik uttejana houn majh viry patan jhal tevha pasun mala sex baddal khupach attraction aahe tyamule mala me 10 vi madhe astana mala hastamaithun kelyamule kivha tyachyahi agoder pasun mala hastmaithunachi savay lagli tyamule majh abhyasat kami lakshy lagal aani me pudhe science la admission gheu shaklo nahi ani manat satat yenare kamuk vichara mule mala nehme as vatayach ki me khup ghanerad kam karat aaho tyamule me nirash jhalo ani me satat ekte rahayala laglo tyamule majhya manavar parinam jhala ani me as vatate ki jivnat me kahich karu shaklo nahi

2 उत्तर
Answer for Sex problem answered 7 years ago

मित्रा, तुझे वय फक्त २६ वर्ष आहे. अजून आयुष्यात करण्यासाठी तुझ्याकडे बराच वेळ आहे त्यामुळे निराश होऊ नकोस. खरंतर यात तुझं दोष नाही. आपल्या समाजामध्ये लैंगिक प्रश्नांविषयी मोकळेपणाने बोलण्यासाठी जागाच नाही. त्यामुळे तुझ्यासारखे अनेक मित्र- मैत्रिणी लैंगिकतेविषयीचे गैरसमज डोक्यात घेऊनच जगतात.

सगळ्यात महत्वाचे म्हणजे लैंगिक इच्छा होणे यात काहीही गैर नाही. नैसर्गिकच आहे ते. मग त्याविषयी मनात भीती किंवा अपराधीपणाची भावना कशाला ठेवायची? तू जर काही चूकच केली नाहीस तर मग कशाला घाबरायचं ?

आता हस्तमैथुनाबद्दल बोलूयात. हस्तमैथुन करण्यात काहीही गैर नाही. हस्तमैथून करणं ही सर्वात सुरक्षित लैंगिक क्रिया आहे. हस्तमैथुनाचे कोणतेही तोटे नाहीत. हस्तमैथुन करताना स्वच्छतेची काळजी घेणं आवश्यक आहे. हस्तमैथुनातून आनंद मिळत असेल तर त्यात घातक काही नाही. मात्र कुठल्याही गोष्टीचा अतिरेक निरोगी नसतो. सतत हस्तमैथुन करण्याची इच्छा निर्माण होणे देखील योग्य नाही हेही आपण हेही लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे आपल्या मनात लैंगिक क्रिया करण्याची इच्छा सतत येत राहण्याची शक्यता आहे व आपल्या भविष्यात त्याचे मानसिक दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे त्यामुळे तसे जर का होत असेल तर आपले लक्ष दुसऱ्या क्रियाशील कामांमध्ये घालण्याचा प्रयत्न कर. वाचन कर, खेळांमध्ये लक्ष घालण्याचा प्रयत्न कर. याविषयीचा लेख वाच. https://letstalksexuality.com/masterbation_safe_pleasurable/ आणखी काही प्रश्न असतील तर खालील लिंकवरील प्रश्नोत्तरे वाचा.

प्रश्नोत्तरे :- https://letstalksexuality.com/question/

हे सगळं तू अगदी मोकळेपणाने बोलतोयस हे ऐकून बरं वाटलं. तुला अजून कोणाची तरी प्रत्यक्ष भेटून मदत घेता येईल. एखाद्या समुपदेशकाला भेट. तुला काही हेल्पलाईन नंबर्स पाठवत आहे त्यांना फोन कर तुला त्याची मदत होईल.

हेल्पलाईन नं- 9763640480 (सोमवारी संध्याकाळी ७ ते ९ या वेळेतच फोन कर)

‘आयकॉल’ हेल्पलाईन-०२२ २५५२११११

युवकांसाठी हेल्पलाईन – ८१४९७५६७९६

आणखी मदत लागली तर आम्हाला नक्की लिही. यातून तू नक्की बाहेर निघशील.. तेव्हा आम्हाला नक्की सांग. आम्हाला तुझ्या आनंदात सहभागी व्हायला नक्की आवडेल. तुला खूप खूप शुभेच्छा… काळजी घे…

आपले उत्तर प्रविष्ट करा

6 + 20 =