1 उत्तर
Answer for STRICHE SHARIR V MAHITI answered 8 years ago

आपण सतत वाढत असतो आणि आपण सतत बदलत असतो. जन्मापासून आपल्या शरीराच्या आकारात किती तरी बदल झाले आहेत. आपली कौशल्यं वाढली आहेत. आपल्या शरीराचा आकार, रंग, क्षमता अनेक गोष्टींवर अवलंबून असते. वय, लिंग, कामाचा प्रकार, जनुकं, आपण जिथे राहतो तिथलं वातावरण आणि समाजाच्या चाली रिती या सगळ्याचा आपण कसं दिसतो यावर खूप खोल परिणाम होत असतो. रस्त्यात उन्हात काम करणाऱ्या कष्टकऱ्याचं शरीर ऑफिसमध्ये बसून काम करणाऱ्या माणसापेक्षा वेगळं दिसणारच. आपली शरीरं वेगळी आहेत तरीही नॉर्मल आहेत.

आपल्या शरीराच्या आत काय चालू असतं हे आपल्याला समजत असतं. शरीर आपल्याला ते सांगत असतं. एखादा आजार असो किंवा काही तरी बदलत असो. शरीराची भाषा समजू लागली तर आपल्याला या गोष्टी कळू शकतात. आणि त्या ऐकल्या, त्यानुसार आपल्या राहणीत काही बदल केले तर आपली आपल्या शरीराशी मैत्री होऊ शकते. अधिक माहितीसाठी शरीर साक्षरता वाचा.

https://letstalksexuality.com/female-body/

आपले उत्तर प्रविष्ट करा

10 + 3 =