What can I do asked 7 years ago

What can I do- मी 18 वर्षाचा आहे मी हस्तमैथुन करतो पण माझे समाधान होत नाही. मला संभोग करावासा वाटतो. माझी खूप इच्छा होते. मला संभोग करायचा आहे. मी कधीच सेक्स केला नाही मला girl friend पण नाही मग अशा वेळेस मी काय करावं. please give me answer. Thank you.

1 उत्तर
Answer for What can I do answered 7 years ago

मित्रा, सेक्सची इच्छा होणं हे अगदी नैसर्गिक आहे. त्यात काहीच गैर नाही किंवा चुकीचे नाही. पण कोणत्याही मुलीसोबत सेक्स करावासा वाटणं हे अडचणीचं ठरू शकतं. सेक्स करण्यासाठी समोरच्या व्यक्तीची इच्छा आणि संमती असणं पण तितकंच गरजेचं आहे. तुम्ही कोणत्याही मुलीसोबत असेच लैंगिक संबंध प्रथापित करू शकत नाही. तसा प्रयत्न केला तर तुम्ही अडचणीत येऊ शकता. समोरच्या व्यक्तीची इच्छा, संमती आणि आदर करणं महत्वाचं.

फक्त लैंगिक नात्यासाठी जोडीदार शोधायचा का हे तुमच्यावर अवलंबून आहे. पण समोरच्यालाही तसंच वाटायला पाहिजे. खोटं सांगून, खोटी आश्वासन देऊन असं नातं बनविलं तर तुम्ही अडचणीत येऊ शकता. शिवाय याला खऱ्या अर्थानं संमती म्हणता येणार नाही.

काहीजण असे जोडीदार शोधण्यासाठी वेश्यांकडे जातात किंवा डेटिंग साईटसचा वापर करतात. पण त्यात धोके असू शकतात.

जे काही कराल त्याची जबाबदारी तुमच्यावरच असेल त्यामुळे अर्थातच जे काही कराल ते विचारपूर्वक करा. नको असलेली गर्भधारणा आणि लैंगिक संबंधांतून पसरणारे आजार टाळण्यासाठी कंडोमचा वापर आवश्यक आहे.

खालील लिंक्सवरील लेख वाचा.

https://letstalksexuality.com/category/talking-about-sex/page/2/

https://letstalksexuality.com/what-is-sex/

आपले उत्तर प्रविष्ट करा

10 + 18 =