प्रश्नोत्तरेबाईला कसा सेकस आवडतो

1 उत्तर

सेक्स किंवा खरं तर अशी कोणतीच क्रिया नाही ज्याच्यामध्ये सगळ्यांच्या आवडीनिवडी सारख्या असतील. प्रत्येक व्यक्तीला कशाने छान वाटतं हे त्या व्यक्तीलाच माहित असतं. त्यामुळे सगळ्याच स्त्रियांना कसा सेक्स केल्यावर आनंद मिळेल असं सरसकट उत्तर देणं अवघड आहे. तरीही समोरच्या व्यक्तीला कशात आनंद मिळतो हे तुम्हाला जाणून घ्यायचंय म्हणजे तुम्ही एक समजूतदार जोडीदार आहात हे नक्की.

सेक्स किंवा प्रेम ही दोघांनी मिळून करण्याची गोष्ट आहे. त्यामध्ये एकमेकांचा, एकमेकांच्या आवडी-निवडींचा विचार महत्त्वाचा आहे. त्याबद्दल बोलायला पाहिजे, मतांचा आदर ठेवायला पाहिजे. ज्या गोष्टींचा त्रास होतो त्या टाळायला पाहिजेत. सेक्समध्ये आनंद मिळवायचा असेल तर हे आवश्यक आहे.

स्त्रियांमधील ऑरगॅझम (लैंगिक पूर्ती)

स्त्रियांना अशा प्रकारची संवेदना किंवा जाणीव असते हेच अनेक स्त्री पुरुषांना माहित नसतं. त्यामुळे अनेक स्त्रियांना ऑरगॅझमचा अनुभवच आलेला नसतो. स्त्रियांच्या योनिमध्ये क्लिटोरिस नावाचा एक पूर्णपणे लैंगिक अवयव असतो. क्लिटोरिस अतिशय संवेदनशील अशा स्नायूंनी बनलेला असतो. त्याचं टोक मूत्रद्वाराच्या किंवा लघवीच्या जागेच्या वरच्या बाजूला असतं पण त्याची आतली रचना संपूर्ण योनिमध्ये असते. क्लिटोरिसला स्पर्श झाला, ते घासलं गेलं की ते उत्तेजित होऊन थोडं ताठर होतं. हळूहळू त्यातील संवेदना वाढतात. स्त्रीच्या हृदयाचे ठोके वाढतात आणि लैंगिक सुखाचा बिंदू गाठला की योनि व योनिमार्गातील, गुदद्वाराचे स्नायू प्रसरण आकुंचन पावतात आणि स्त्रीला लैंगिक सुखाचा अनुभव येतो. अनेकदा स्तनाग्रं किंवा शरीरातील इतर अवयवांना कुरवाळल्याने किंवा स्पर्श केल्यानेही ऑरगॅझम यायला मदत होते.

प्रत्येक व्यक्ती वेगवेगळी असते त्यामुळे प्रत्येकीला कशाने चांगला वाटेल, कशाने उत्तेजना निर्माण होईल हे सांगता येणं अवघड आहे. तरीही तुमचा तुमच्या जोडीदाराबरोबर चांगला संवाद असेल तर तिला कशाने चांगलं वाटतं हे तुम्हाला एकमेकांशी बोलून कळू शकेल. त्यासाठी संवाद वाढवणं, घाई न करणं आणि एकमेकांना आवडेल अशा गोष्टी करणं हेही खूप महत्त्वाचं आहे.

अजून एक गोष्ट लक्षात घ्या. लैंगिक उत्तेजना केवळ लैंगिक संबंधांच्या वेळीच निर्माण होते असं नाही. एरवी दिवसभरात तुम्ही काय काय गोष्टी एकत्र करता, एकमेकांचा सहवास तुम्हाला मिळतो का, तुम्ही इतर काय काय शेअर करता त्या सगळ्याचा परिणाम लैंगिक इच्छेवर आणि लैंगिक उत्तेजनेवर होत असतो. त्यामुळे एरवीही एकमेकांना आनंद वाटेल अशा गोष्टी करत रहा.

एक गोष्ट मात्र नक्की. आपण केवळ सेक्स करण्यासाठी वापरलं जाणारं, जोडीदाराची शारीरिक गरज भागवणारं शरीर आहोत, आपल्या भावभावनांचा, सुखाचा विचार सेक्समध्ये नाही अशी भावना मुलींच्या मनात येत असेल तर ते त्यांना नक्कीच आवडणार नाही. मर्जीविरुद्ध, जोडीदाराला इच्छा झाली म्हणून सेक्सची जबरदस्ती मुलींना आवडणार नाही. किंवा एखाद्या फिल्ममध्ये पाहिलेली क्रिया मर्जीविरुद्ध करायला मुलींना आवडेल असंही वाटत नाही. आणि हेच सगळं पुरुषाच्या बाबतीतही तितकंच खरं आहे. अनेक मुलांना असं वाटतं की जोपर्यंत मुलीच्या डोळ्यात पाणी येत नाही तोपर्यंत तिला आनंद मिळत नाही. असले समज डोक्यातून काढून टाका. अधिक माहितीसाठी खालील लिंक्सवरील लेख वाचा.

https://letstalksexuality.com/orgasm/

https://letstalksexuality.com/clitoris/

याशिवाय वेबसाईटवर यासंदर्भातील अनेक प्रश्नोत्तरे चर्चिली आहेत तीही नक्की वाचा. खाली प्रश्नोत्तरांची लिंक देत आहे.

https://letstalksexuality.com/question/

आपले उत्तर प्रविष्ट करा

10 + 9 =