प्रश्नोत्तरेZhavaychi ichya khup hote
Zhavaychi ichya khup hote asked 7 years ago

1 उत्तर

झवने यांसारखे इतर शब्द सहसा शिव्यांमध्ये येतात आणि म्हणून त्यात एक नकारात्मकता येते. तसेच हे शब्द हिंसक आणि अतिशय अपमानकारक वाटतात. काहीजणांना पर्यायी शब्द माहित नसतात, हे मी समजू शकते पण जाणूनबुजून असे शब्द वापरले जात असतील तर ते ताबोडतोब थांबवले पाहिजे. योग्य काय, अयोग्य काय याच्यामध्ये मी जाणार नाही पण समोरच्या व्यक्तीला देखील छान वाटावं, तुमच्याशी लैंगिकतेबद्दल बोलावसं वाटावं यासाठी पर्यायी शब्द वापरण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करावा. झवने यासाठी लैंगिक संबंध, लैंगिक समागम, संभोग आणि इंग्रजीमध्ये सेक्स असे पर्यायी शब्द आहेत.

सेक्सची करण्याची इच्छा होणं अगदी स्वाभाविक आणि नैसर्गिक आहे. पण सेक्स ही एक जबाबदार कृती आहे. यासाठी दोन्ही जोडीदाराची संमती, इच्छा आणि सुरक्षितता हे अत्यंत महत्वाचे आहे. जोडीदाराच्या संमतीशिवाय सेक्स करणे हा कायद्याने गुन्हा आहे.

जोडीदार नसेल तर हस्तमैथून करणं ही सर्वात सुरक्षित लैंगिक क्रिया आहे. हस्तमैथुनाचे कोणतेही तोटे नाहीत. हस्तमैथुन करताना स्वच्छतेची काळजी घेणं आवश्यक आहे. हस्तमैथुनातून आनंद मिळत असेल तर त्यात घातक काही नाही.

आपल्या वेबसाईटवर हस्तमैथुनासंबंधी अनेक प्रश्न चर्चिले आहेत. अधिक माहितीसाठी कृपया ‘FAQ – शंका समाधान’ तसेच प्रश्नोत्तरे जरूर वाचा. तुम्हाला शोधणे सोपे जावे यासाठी लिंक देत आहे.

‘FAQ – शंका समाधान’: https://letstalksexuality.com/frequently-asked-questions/

प्रश्नोत्तरे :- https://letstalksexuality.com/question/

आपले उत्तर प्रविष्ट करा

19 + 18 =