प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsएका विधवा तरुणीशी लग्न केलं तर hiv होतो का तीला मि एका वर्षापासुन सेक्स करत आहे तीच वय २५ वर्ष आहे

1 उत्तर

एच.आय.व्ही.ची लागण शरीरातील स्रावांमधून एका व्यक्तीकडून दुसऱ्याला होऊ शकते. एचआयव्ही लैंगिक संबंधातून आणि इतर मार्गानेही पसरतो. रक्त, वीर्य, वीर्याच्या आधी बाहेर येणारा स्राव, योनीस्राव, आईचं दूध या स्रावांमधून एचआयव्हीचा विषाणू दुसऱ्याच्या शरीरात जातो.

एच.आय.व्ही.ची लागण झालेल्या व्यक्तीसोबत कंडोम न वापरता केलेल्या लैंगिक संबंधातून (संभोग, मुख मैथुन आणि गुदा मैथुन) लागण होऊ शकते.

एचआयव्हीची लागण होण्याचे बिगर लैंगिक मार्ग म्हणजे

निर्जंतुक न केलेल्या इंजेकशनच्या सुया, दूषित रक्त आणि प्रसूतीच्या वेळी आईकडून बाळाला एचआयव्हीची लागण होऊ शकते.

लिंगसार्गिक आजार असतील तर एचआयव्ही होण्याचा धोका वाढतो.

एच आय व्ही/ एड्स बद्दल अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://letstalksexuality.com/hiv_aids/

आपले उत्तर प्रविष्ट करा

2 + 4 =