प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsएच आय वी बद्दल शंका

मी 30 वर्षीय विवाहित पुरुष असून १० वर्षापूर्वी माझे एका बाईशी लैंगिक संबंध आले होते (निरोध न वापरता 2 वेळा ) 5 वर्षापूर्वी माझा विवाह झाला असून मला एक अपत्य आहे, परंतु सुमारे 1 वर्षापासून माझे तोंड येते आहे,(डॉक्टरांना दाखवले त्यांनी उपचार केलेवर तात्पुरता आराम मिळतो ) 4 महिन्यापासून घश्यात दुखत आहे हि कशाची लक्षणे आहेत, मला एच. आय.वी. ची शंका वाटते, परंतु टेस्ट करायला भीती वाटते, जर positive आली तर तो धक्का मला सहन होणार नाही असे वाटते, मी पूर्णपणे तुटून पडलो आहे , काय करावे कळत नाही

1 उत्तर

पहिल्यांदा थोडं शांतपणे विचार करा तुम्हाला नक्की काय हवं आहे. एच. आय. व्ही विषयी भीती मनात घेऊन जगायचं की एच. आय. व्ही टेस्ट करून मनातील शंकेच निरसन करायचं. एच. आय. व्ही ची लागण ही लैंगिक संबंध येत असणाऱ्या व्यक्तींपैकी एकाला जरी संसर्ग झालेला असेल तर होते. तुमचा लैंगिक संबंध आलेली व्यक्ती एच. आय. व्ही बाधित होती का? केवळ इतर शारीरक त्रासांवरून तुम्ही अंदाज लावताय? यासाठी न घाबरता एच. आय. व्ही ची तपासणी करून घ्या. लागण झालेली नसेल तर चांगली गोष्ट आहे. एच. आय. व्ही/ एड्स. पूर्णपणे बरा होत नसला तरी त्यावर काही उपचार उपलब्ध आहेत. जी काही परिस्थिती असेल ती स्वीकारणं आणि त्यातून मार्ग काढणे योग्य ठरेल. त्यासाठी लवकरात लवकर तपासणी करून घ्या.

एखद्या विश्वासातल्या व्यक्तीची, समुपदेशकाची मदत घ्या ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील. काळजी घ्या.

एच. आय. व्ही/ एड्स विषयी अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://letstalksexuality.com/hiv_aids/

आपले उत्तर प्रविष्ट करा

6 + 10 =