अजिबात नाही. ही पुरुषांसाठीची सोपी कायमस्वरूपी गर्भनिरोधक पद्धत आहे. वृषणावर छोटा छेद देतात आणि बीजनलिका मध्ये कापून त्यांची तोंडं बंद करतात. यामुळे बीजं वीर्यामध्ये मिसळत नाहीत. नसबंदी झाल्यानंतर पुढचे किमान तीन महीने किंवा २० लैंगिक संबंधांपर्यंत निरोध वापरावा. कारण काही बीजं आधीच वीर्याकोशात गेली असतील तर त्यापासूनही गर्भधारणा होऊ शकते. पुरुषांची नसबंदी ही सर्वात सोपी आणि सुरक्षित गर्भनिरोधक पद्धत आहे. या शस्त्रक्रियेचा लिंगाच्या स्नायू किंवा नसांशी संबंध येत नसल्याने लैंगिक संबंधांमध्ये कसलाही अडथळा येत नाही.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवरील लेख वाचा.