प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsपुरुषाला पुरुषापासून एडस होतो का?
1 उत्तर

हे नेहमी लक्षात ठेवा, एड्स ही आजाराची एक अवस्था आहे. एच.आय.व्ही. विषाणूची लागण झाल्यावर अशी अवस्था येवू शकते. एच.आय.व्ही.ची लागण ही एच.आय.व्ही. असलेल्या व्यक्तीसोबत केलेल्या असुरक्षित संबंधांमुळं होते. म्हणजेच एच.आय.व्ही.ची लागण असलेल्या व्यक्तीसोबत केलेल्या असुरक्षित लैंगिक संबंधांमुळं पुरुषाला पुरुषापासून एच.आय.व्हीची लागण होवू शकते. अनेकवेळा समलैंगिक पुरुष एकमेकांशी लैंगिक संबंध ठेवताना गुदद्वाराचा आणि मुखाचा वापर करतात. गुदद्वारातील स्नायू लवचिक नसल्यामुळं लिंग आतमध्ये जाताना जखम होण्याची शक्यता असते. त्यामुळं पुरुषांनी समलैंगिक संबंध ठेवताना कंडोमचा वापर करावा.

एड्स/एच.आय.व्ही. नक्की कसा होतो याबद्दल अधिक माहितीसाठी पुढील लिंकवर क्लिक करा.

https://letstalksexuality.com/hiv_aids/

आपले उत्तर प्रविष्ट करा

0 + 6 =