यासाठी आपल्याला स्त्रीच्या शरीरातलं पाळी चक्र समजून घ्यावं लागेल. स्त्रीच्या शरीरात साधारणपणे महिन्यातून एक स्त्रीबीज तयार होतं आणि बीजकोषातून बाहेर येतं. स्त्रीबीज बीजनलिकेमध्ये केवळ १२ ते २४ तास इतका काळ जिवंत राहू शकतं. बीज बाहेर येण्याच्या आधीचे चार दिवस आणि नंतरचे दोन दिवस हा काळ (गर्भधारणेचा काळ) मानला जातो. या काळात पुरुषबीजाचा संपर्क झाला तर फलित गर्भ तयार होतो. मात्र या काळाच्या व्यतिरिक्त इतर दिवशी संबंध आले तर दिवस रहात नाहीत. मात्र गर्भधारणेच्या काळामध्ये वीर्याचा एक थेंबही पुरेसा असतो. कारण एका थेंबामध्येसुद्धा हजारो पुरुषबीजं असतात. पुरुषबीजांना शुक्राणू असंही म्हणतात. म्हणूनच एकदा संबंध आले तरीही गर्भधारणेची शक्यता असते.
अधिक माहितीसाठी कृपया आपल्या वेबसाईट मधील हा लेख वाचा. इथे तुमच्या प्रश्नांची आणखी उत्तरं तुम्हाला मिळतील.
https://letstalksexuality.com/menstrual-and-fertility-cycle/