माझ नाव आकाश आहे वय २० आहे मी साधारण १२-१३ व्या वर्षापासून पॉर्न पहातो हस्तमैथुना बाबतीत ले पॉर्न पाहून भविष्यात आपल्या जोडीदारकडून तश्या सेक्स ची अपेक्षा ठेवने बंद झाले अशी अनेक प्रश्न होते गैरसमज शंका होत्या पण वेबसाईमळे ते समज दुर झाले या बद्दल मी आपला आभारी आहे प्रश्न असा होता कि मला पॉर्न सुटत नाही मी आठवड्यातून किमान दोन वेळा तरी पॉर्न पहातो मला नंतर अस्वस्थ वाटत पण पहाताना आनंद वाटतो पण नंतर निराशा येते दुसरा प्रश्न असा कि माझ हस्तमैथुन। करताना चार ते पाच सेकंदातचा वीर्य बाहेर पडत तुमची स्टार्ट स्टॉप पद्धतही हस्तमैथुन करताना केली पण फरक जाणवत नाहीये बहुतेक पॉर्न पाहुन अतिउत्तेजना मुळे होत असाव तरी आता मी पॉर्न पहान बंद केलय, पण कधी कधी मी आठवड्यातून एकदा दोनदा तरी पहातोच, एकदा मी मनात जास्त उत्तेजीत भाव न ठेवता शिश्नमुंडाला हात न लावता हस्तमैथुन केले होते तेव्हा ते १५मिनीटानपर्यंत हस्तमैथुन चालल मनाला खुप बर वाटल तेव्हा पण पुन्हा तस करायला गेलो तर होत नाही, माझ्या लिंगाचा पुढील भाग खुप संवेदनशील आहे मला पाच वर्षापासुन हस्तमैथुन करताना अशी समस्या जाणवतेय अनेक प्रयोग हि केले तरी हे वीर्य लवकरच बाहेर येत यावर उपाय सुचवा मला संभोगगाचा अनुभव नाही मी लग्ननतंर करू इच्छितो पण लग्न मी उशीरा करू इच्छितो तो पर्यंत मला माझ्या समाधानासाठी हस्तमैथुनानच कराव लागेल, पण या शिघ्रपतना मुळे भविष्यातील जोडीदाराचाही विचार करून या तीन सेंकदाच्या कालावधीत तिला कस समाधानी करू असा प्रश्नही येतोच. सेक्स साठी माझी मानसिक तयारी जरी असली तरी शारीरीक नाही. मी चार पाच सेकंदातच रस्खलित होतो. ड्रग घेतल्याने होणार्या नुकसानापेक्षा जास्त मेंदूचे नुकसान पॉर्न पहान्यामुळे होत. मेंदू मधे “dopamin ” नावाचा द्रव्य जास्त बाहेर पसरतो त्यामुळे.
उपायासाठी पुण्यात प्रत्यक्ष भेटण्यासाठीही तयार आहे वरील प्रश्नाची उत्तरे देणे आणि तुमचे पुन्हा एकदा आभार. आशा आहे की उत्तर द्याल.
मित्रा, सर्वप्रथम वेबसाईट संबंधीच्या तुझ्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. तुझ्यासारख्याच असंख्य मुलांसाठी ही वेब साईट अनेक अर्थाने उपयोगाची आणि सकारात्मक मूल्य रुजविणारी ठरत आहे आणि हाच या वेबसाईटचा उद्देशही आहे. आता तुझ्या प्रश्नाकडे वळू या. तुला पोर्न पाहून अस्वस्थ वाटतं किंवा कदाचित हस्तमैथुन करून झाल्यानंतर वाईट वाटतं याला एक कारण मला जाणवतंय. तू विचारकरून पहा याचा. पोर्न पाहणं किंवा हस्तमैथुन करणं हे मुळात वाईट आहे असा तुझा समज आहे का? कारण असं या वेबसाईट वर तरी कुठे म्हटलेलं नाही. हस्तमैथुन ही स्वतःला आनंद मिळवून देण्याची आणि सुरक्षित अशी अगदी नॉर्मल पद्धत आहे. त्यात काहीही वावगं नाही. मोठे होत असताना अनेकदा आपल्याला जे सामाजिक संदेश मिळतात त्यातून हस्तमैथुनाबद्दल एक प्रकारचा नकारात्मक भाव आपण आत खोल कुठे तरी बाळगत असतो. तो अगोदर काढून टाकायला हवा. या भावनेतूनच बहुदा मुलं हस्तमैथुन घाई घाईने, संडासात किंवा कुठल्यातरी नकोशा जागी, असुरक्षित पद्धतीने ‘उरकतात’. असे करण्याची खरं तर काही आवश्यकता नाही. आपण स्वतःला हा वेळ देत आहोत तर तो वेळ, ती जागा, तो काळ, ते वातावरण आल्हाददायी, सुरक्षित आणि पुरेसा खाजगीपणा असलेलं नको का? विचार कर.
पोर्न पाहावे का पाहू नये या बद्दल ठाम असा काही मत प्रवाह नाही. त्यातील काल्पनिकता, असंभव गोष्टी करण्याची पद्धत, अतार्किकता, हिंसा आणि बाजार पाहून या उद्योगाबद्दल अनेक सुविचारी लोकांमध्येही विरोधाची मतं आहेत. पण कोणत्याही सुविचारी लोकांनी पोर्न बंद करा असे म्हटलेले ऐकिवात नाही. एखादी व्यक्ती स्वतःच्या लैंगिक आनंदासाठी आपल्या खाजगी स्पेसमध्ये, कुणावरही कोणताही अन्याय न करता काय करते, काय पाहते ही त्या त्या व्यक्तीची खाजगी बाब आहे. त्यात काही गैर किंवा वाईट नाही. त्यामुळे तुझ्या मनात पोर्न पाहणे म्हंजे काही तरी घाण आहे, पाप आहे, वाईट आहे असे असेल तर तेही काढून टाक.
आता शीघ्रपतनाबद्दल. आपल्या समाजात दर तीन पैकी एका पुरुषाला याचा अनुभव येतो असे म्हणतात. खरे खोटे माहित नाही पण या वेबसाईट वर ही अशा प्रकरच्या प्रश्नांचा भडीमार आहे. मी तुला सुचवेन की शोधून ते प्रश्न तू नक्की वाच. काही लिंक्स खाली देत आहे. काही लेख तू अगोदरच वाचलेले असतील.
https://letstalksexuality.com/premature-ejaculation/
मित्रा तुला एवढेच सुचवेन की तू पुढचा विचार करून अगोदरच घाबरत आहेस. तसे करण्याची आवश्यकता नाही. शिवाय आपल्या जोडीदाराला आनंद देण्यासाठी समाधान देण्यासाठी नेहमी लिंगाची आवश्यकता नसते हे सुद्धा ध्यानात घे. लैंगिक सुख मिळवण्याच्या आणि देण्याच्या अनेक इतर पद्धती आहेत त्याबद्दल माहिती मिळव. आणि जेंव्हा अवश्यकता असेल तेंव्हा एखाद्या सेक्सोलोजिस्ट चा सल्ला घे. औधाधांचा वापर, काही बिहेविअरल टेक्निक, व्यायाम, समुपदेशन अशा अनेक पद्धतींचा वापर करण्याविषयी ते मार्गदर्शन करू शकतात. ऑल दि बेस्ट.