प्रत्येकासाठी सेक्सची पद्धत वेगवेगळी असू शकते. सेक्समध्ये विविध प्रकारच्या लैंगिक क्रियांचा समावेश होतो. शारीरिक जवळीक, स्पर्श, प्रणय आणि संभोग अशा विविध प्रकारे लैंगिक संबंध ठेवले जातात. संभोग म्हणजे पुरुषाचे लिंग स्त्रीच्या योनिमध्ये प्रवेश करणे. यासोबतच मुखमैथुन, गुदमैथुन हेही संभोगाचे इतर काही प्रकार आहेत. सेक्स कसा करावा हे जोडीदारासोबत संवाद साधून ठरवणे आवश्यक आहे. परस्परांना आनंद मिळेल, छान वाटेल आणि त्रास होणार नाही या गोष्टींचा मात्र विचार करावा. जर तुम्हाला जोडीदाराशिवाय लैंगिक सुखाचा आनंद घ्यायचा असेल तर हस्तमैथुन हा सर्वात सुरक्षित आणि सोपा उपाय आहे. सेक्स ही मनाला आणि शरीराला आनंद देणारी कृती आहे. एखाद्या व्यक्तीसोबत लैंगिक संबंध ठेवताना त्या नात्यातील प्रेम, विश्वास, आदर, संमती आणि पारदर्शकता महत्वाची आहे. फसवणूक करून, खोटं बोलून, जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवणे हा कायद्याने गुन्हा आहे. अशा व्यक्तीवर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकतो. लैंगिक संबंध ठेवताना दोघेही सज्ञान आहेत का? दोघांचीही ठेवढीच इच्छा, ओढ आणि संमती आहे का? लैंगिक संबंध सुरक्षित आहेत का हे लक्षात घेणं महत्वाचं आहे.
आपल्या वेबसाईटवर याविषयीचे अनेक लेख आणि प्रश्नोत्तरे चर्चिली आहेत ती अवश्य वाचा.
https://letstalksexuality.com/category/talking-about-sex/
https://letstalksexuality.com/question/
1 उत्तर
आपले उत्तर प्रविष्ट करा