मर्द आणि मर्दानगी

हे शब्द आपल्या खूप परिचयाचे आहेत. लहानपणापासून खूपदा ऐकलेले असतात. मुख्यतः मर्द हा शब्द पुरुषांना उद्देशून वापरतात. पण मग पुरुष आणि मर्द हे समान अर्थी शब्द समजले जातात का? तर नाही. त्यात थोडा फरक आहे. जन्मतः ज्यांना लिंग असते ते सर्व पुरुष या वर्गात मोडतात (असा एक साधारणपणे समज असतो). पण मर्द बनण्यासाठी काही विशेष गुण लागतात. म्हणजे काही विशेष अटींची पूर्तता करावी लागते तरच त्या पुरुषाला मर्द समजलं जातं. काय असतात त्या अटी? तुम्ही एखादी सांगू शकता?

बरोब्बर.. बाकदार मिशा, पिळदार दंड, हातात कडं, ही मर्दाची काही लक्षणं. मर्द कधी रडत नाहीत, कशाला घाबरत नाहीत, भांडणांमध्ये नेहमी पुढे, इत्यादी… मर्दाच्या अशा अनेक व्याख्या सांगता येतील. मर्दपणाचे असे सर्व अर्थ वाहत, वागवतच आपण, विशेषतः मुलगे, मोठे होतो. पोरीसारखा काय रडतोस हे वाक्य ऐकलं आहे कधी? साधी पोरगी पटवता येत न्हाई व्हय मर्दा, बायकोचं ऐकणारे मर्द नसतात, इ. इ. गुण मर्द या विशेषणाखाली येतात.

मर्दानगीच्या या संकल्पना खूप काचतात. त्यांचं ओझं घेवूनच मुलगे मोठे होतात. ही परिमाणं ठरतात एखाद्याचं मूल्यमापन करण्याचे. जो या साच्यात, चौकटीत बसत नाही तो समूहापासून वेगळा पडतो किंवा पाडला जातो किंवा फक्त भार वाहण्याचं काम करतो.

खरं तर आपण सर्व एकमेव आणि वेगळे आहोत. सर्वांना एकच एक साच्या नाही.

ह्या सर्व चाकोऱ्या आहेत पुरुषप्रधान संस्कृतीच्या, ज्या सहजा सहजी मोडता येत नाहीत पण त्या मोडणं फार गरजेचं असतं. या माणूसपण नाकारणाऱ्या चौकटी मोडून अधिक संवेदनशील बनण्याकडे आपण सर्वांनी जायला हवं. तुम्ही मोडल्या आहेत अशा काही चौकटी?

आम्हाला सांगा…

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल...

No Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी

Copy link
Powered by Social Snap