प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsकिस केल्यानंतर गर्भधारणा होते का??

किस केल्याने गर्भधारणा होते का? किंवा मासिक पाळी मध्ये काही बदल होतात का? कारण किस केल्यानंतर माझी मासिक पाळी झाली नाहीये?

1 उत्तर

नाही. केवळ किस करणे, हातात हात घेतले, मिठी मारली तर गर्भधारणा होत नाही. पुरुषाच्या शरीरातील पुरुषबीज स्त्रीच्या शरीरातील स्त्रीबीजापर्यंत जावं लागतं आणि तिथे त्यांचा संयोग होऊन फलित बीज तयार झालं तरच गर्भ राहतो. मात्र हे होण्यासाठी पुरुषाच्या लिंगाचा स्त्रीच्या योनीमध्ये प्रवेश होणं किंवा संपर्क यावा लागतो. त्याशिवाय मुलगी किंवा स्त्री गरोदर राहू शकत नाही. म्हणूनच पुढे जाऊन जर लैंगिक संबंध येणार असतील तर कंडोमचा वापर करणे गरजेचे आहे.

गर्भधारणा कशी होते आणि नको असलेली गर्भधारणा कशी टाळावी याविषयी अधिक माहितीसाठी खालील लिंकवरील लेख वाचा.

https://letstalksexuality.com/conception/

https://letstalksexuality.com/contraception/

आपले उत्तर प्रविष्ट करा

15 + 9 =