प्रश्नोत्तरेपाळी आल्यावर १८ ,२० दिवसांनी गर्भधारणा होती का?

1 उत्तर

सर्वप्रथम  गर्भधारणा कशी आणि कधी होते हे समजून घेऊया. दर पाळीचक्रामध्ये (साधारणपणे २२ ते ३५ दिवसाचे एक चक्र) एक स्त्रीबीज पूर्ण तयार होऊन बीजकोषातून बाहेर येते व बीजवाहिन्यांमध्ये जाते. या प्रक्रियेला अंडोत्सर्जन (Ovulation) म्हणतात. बीजवाहिनीमध्ये हे बीज १२-२४ तास जिवंत असते. त्या काळात पुरुष बीजाशी संपर्क आला तर तिथे त्यांचं मिलन होऊन गर्भधारणा होऊ शकते. पाळी चक्रातील काही ठराविक दिवसांमध्येच गर्भधारणा होऊ शकते. अंडोत्सर्जन होण्याच्या आधी आणि नंतरचे ३-४ दिवस या काळात गर्भधारणा होण्याची जास्त शक्यता असते. अंडोत्सर्जनाचा काळ हा प्रत्येकीसाठी वेगवेगळा असतो. समजा पाळीच्या पहिल्या दिवसापासून १६ व्या किंवा १७ व्या  दिवशी  अंडोत्सर्जन झाले आणि १८ व्या दिवशी संबंध आले तर गर्भधारणेची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच नको असणारी गर्भधारणा टाळण्यासाठी योग्य ते गर्भनिरोधक वापरणे योग्य. गर्भधारणा नक्की कशी होते आणि  गर्भनिरोधके याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी खालील लिंक वरील लेख तसेच वेबसाईटवर चर्चिल्या गेलेल्या प्रश्नांची उत्तरे नक्की वाचा.     https://letstalksexuality.com/conception/ https://letstalksexuality.com/contraception/

आपले उत्तर प्रविष्ट करा

12 + 1 =