प्रश्नोत्तरेबायको लवकर करु देत नही काय करु थोड़ी माहिति द्या

2 उत्तर

स्त्रीला उत्तेजित होण्यासाठी पुरुषांपेक्षा थोडा जास्त वेळ लागतो. लैंगिक संबंध किंवा सेक्स म्हणजे फक्त संभोग नसतो. त्याआधी एकमेकांना सुखावेल अशा पद्धतीने जवळीक साधणं आणि एकमेकांना छान वाटेल अशा पद्धतीने संवाद साधणं. म्हणजेच प्रत्येक व्यक्तीला शरीराच्या विशिष्ट भागाला स्पर्श केल्याने लैंगिक सुख मिळत असतं. अशा शरीराच्या अवयवांना स्पर्श केला पाहिजे. याला प्रणय किंवा फोअरप्ले म्हणतात. यामुळे स्त्रीच्या योनीमध्ये ओलावा तयार होतो आणि दोघांमध्ये उत्तेजना निर्माण झाल्याने संभोगाचा आनंद मिळवता येतो. स्त्रीच्या योनीमध्ये संभोगादरम्यान ओलावा असेल तर संभोग सुखकर आणि आनंददायी होऊ शकतो. लैंगिक सुखासाठी गरज आहे सेक्स करण्याची इच्छा, संमती आणि दोघांनाही तेवढीच ओढ. तुमच्या जोडीदाराशी मनमोकळा संवाद साधून त्यांना काय आवडतं ? काय आवडत नाही हे सोडता येईल आणि दोघांनाही लैंगिक संबंधांचा आनंद घेता येईल. तुम्हाला शुभेच्छा…

आपल्या वेबसाईटवर याविषयीची काही लेख आणि प्रश्न चर्चिले आहेत ते नक्की वाचा.

अधिक माहितीसाठी ‘सेक्स बोले तो’ हा सेक्शन आणि वेबसाईटवर दिलेली प्रश्नोत्तरे वाचा.

https://letstalksexuality.com/category/talking-about-sex/

‘FAQ – शंका समाधान’: https://letstalksexuality.com/frequently-asked-questions/

प्रश्नोत्तरे :- https://letstalksexuality.com/question/

आपले उत्तर प्रविष्ट करा

12 + 19 =