प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमला रोज सेक्स करा वाटतो नवरा आठवड्यातुन एकदा करतो ह्या स्थितीत काय करु खुप सेक्स करु वाटतो

1 उत्तर

आपल्या समाजामध्ये स्त्रियांनी लैंगिक कृतींमध्ये पुढाकार घेणे हे वाईट मानले जाते. जे खरंतर अगदी चुकीचे आहे. त्यामुळे सेक्ससाठी किंवा एकूणच लैंगिक कृतींसाठी स्त्रीची कितीही इच्छा असेल तरी मनमोकळेपणाने तिला बोलता येत नाही. स्त्रियांना पुरुषांपेक्षा कमी लैंगिक भावना किंवा गरजा असतात हा ही एक गैरसमज आहे.

तुम्हाला रोज सेक्स करावा वाटत असेल तर यात गैर काहीही नाही. याविषयी तुमच्या जोडीदाराशी सविस्तर बोला. तुमची इच्छा जोडीदाराचा आदर ठेऊन व्यक्त करा. जोडीदाराची रोज सेक्स करण्याची इच्छा नसेल तर त्याचाही आदर ठेवा. सेक्स ही स्वतःच्या आणि परस्परांच्या शरीराला आणि मनाला आनंद देणारी कृती आहे. यामध्ये समोरील व्यक्तीची परवानगी, इच्छा आणि सुरक्षितता खूप महत्वाची आहे.

तसेच हस्तमैथुन केल्यामुळे स्वतःला लैंगिक सुख मिळवता येवू शकते. पुरुष आणि स्त्रिया दोघेही स्वतःच्या लैंगिक इच्छांवर नियंञण ठेवू शकतात. शिवाय सेक्सशिवाय इतरही अनेक गोष्टी आहेत जसे की फोर प्ले ज्यातून तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला आनंद मिळू शकेल आणि तुमचे भावनिक नाते जास्त घट्ट होण्यास मदत होईल.

खालील लिंकवरील लेख नक्की वाचा.

https://letstalksexuality.com/what-is-sex

https://letstalksexuality.com/sexual-pleasure/

https://letstalksexuality.com/foreplay/

आपले उत्तर प्रविष्ट करा

17 + 5 =