प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमासिक पाळीनतर किती दिवसांनी लैंगिक संबंध ठेवायचे?

1 उत्तर

सर्वप्रथम मासिक पाळी च्या चक्राविषयी जाणून घेवूयात. मासिक पाळीचे चक्र हे सर्वसाधारणपणे २२ ते ३५ दिवसाचे असते. या काळात एक स्त्रीबीज पूर्ण तयार होऊन बीजकोषातून बाहेर येते व बीजवाहिन्यांमध्ये जाते. या प्रक्रियेला अंडोत्सर्जन (Ovulation) म्हणतात. बीजवाहिनीमध्ये हे बीज १२-२४ तास जिवंत असते. त्या काळात पुरुष बीजाशी संपर्क आला तर तिथे त्यांचं मिलन होऊन गर्भधारणा होऊ शकते. अंडोत्सर्जन होण्याच्या आधी आणि नंतरचे ३-४ दिवस हा काळ गर्भधारणा होण्यासाठी सर्वात चांगला काळ मानला जातो. त्यासाठी पाळी चक्रातला अंडोत्सर्जनाचा काळ ओळखता आला की त्यानुसार गर्भधारणेसाठी किंवा गर्भधारणा टाळण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. बऱ्याच जणांचा असा समाज असतो की अंडोत्सर्जन १४ व्या दिवशीच होत. पण बहुतेक वेळा ते लवकर किंवा उशीराही होत असत. प्रत्येकाचा मासिक चक्राचा काळ वेगळा असल्यामुळे अंडोत्सर्जनाचा काळ ही वेगळा असू शकतो हे लक्षात घेणे गरजेचे आहे. म्हणूनच गर्भधारणा नकोच असेल तर योग्य ते गर्भनिरोधक वापरणे कधीही चांगले. अधिक माहितीसाठी आपल्या वेबसाईट वरील  https://letstalksexuality.com/conception/ या लिंक वर क्लिक करा. 
 
मासिक पाळी च्या दरम्यान सेक्स करू नये असा काहीही नियम नाही. हा एक प्रचलित गैरसमज आहे की मासिक पाळीच्या दिवसांमध्ये शरीर संबंध येऊ देऊ नयेत. ह्या गैर समाजाचा संबंध पाळीच्या काळात स्त्री अपवित्र असते, तिला स्पर्श वर्ज असतो, पाळीतील रक्त अपवित्र असतं म्हणून तिला ‘बाजूला’ बसवलं गेलं पाहिजे ई अशास्त्रीय बाबी ज्या आपण अनेक पिढ्या सांभाळत आलो आहोत त्यांच्याशी आहे. ह्या पितृप्रधान परंपरा आणि गैरसमजुतीनाच प्रश्न विचारणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे पाळीच्या दरम्यान सेक्स केल्याने स्त्रीला किंवा पुरुषाला काहीही अपाय होत नाही. ह्या दिवसांत संबंध आले तर गर्भधारणेची भीतीही नसते. पण या सोबतच एक गोष्ट लक्षात ठेवू या की पाळी दरम्यान रक्त स्त्राव होत असतो. काही जणींना या काळात ओटी पोटात दुखणे, पाठ दुखणे किंवा चीड चीड होणे अशा लक्षणांचा सामना करावा लागतो. अशा काळात शरीर संबंधांची इच्छा नसणं, नको वाटणं सहज आहे. तसं असेल तर त्याचा आदर कारण गरजेचं आहे. लक्षात घ्या शरीर संबंधांसाठी त्यात सामील व्यक्तींनी एकमेकांची संमती, इच्छा, एकमेकांप्रती किमान आदर आणि सर्वांचा आनंद या गोष्टीना महत्व देणं फार गरजेचं आहे.
आशा आहे की तुम्हाला अपेक्षित प्रश्नाचे उत्तर मिळाले. याशिवाय जर तुमचा काही विशिष्ट प्रश्न असेल तर नक्की विचारा.

Vishal replied 8 years ago

Mazya patnichi masik pali 2-3 mahinyani yete. amhala garbhdharna karaychi ahe. tila ata 4 mahinyani pali ali hoti. Mhanun treatment chalu ahe. Ovulation kase kalnar ?

Mohini shinde replied 2 years ago

Mazi regular problem ala ahe aaj tr mulasathi kdhi praytn kraych?

let's talk sexuality replied 2 years ago

गर्भधारणेचा संबंध हा पाळीशी नसून अंडोत्सर्जनशी आहे. जेव्हा स्त्रीबीज गर्भशयाच्या आसपास उपस्थित होण्याचा काळ असतो, तेव्हाच पुरुषबीजाशी संयोग होऊन गर्भधारणा होऊ शकते. अंडोत्सर्जन हे साधारणत: पाळी यायच्या १५ ते १६ दिवस आधी होते. पाळीचक्र नियमित असल्यास हा काळ तुम्ही शोधू शकता. अंडोत्सर्जन होण्याच्या आधी आणि नंतरचे ३-४ दिवस हा काळ गर्भधारणा होण्यासाठी सर्वात चांगला काळ मानला जातो.
सामान्यतः ३० दिवसांच्या पाळी चक्रात पाळी संपल्यानंतर साधारणत: (दरवेळी असेच होईल असे नाही) १२ ते १४ व्या दिवसांच्या काळात अंडोत्सर्जन होते. त्यामुळे तुम्हाला तुमच्या पाळीचक्रातला अंडोत्सर्जनाचा काळ ओळखता आला तर त्यानुसार गर्भधारणेसाठी प्रयत्न करू शकता.

अंडोत्सर्जन कधी होते हे जाणून घ्यायचे असल्यास तुम्ही स्वत: काही निरिक्षणे घेऊन जाणू शकता. त्याच्या अधिक माहितीसाठी सोबत लिंक देत आहोत.
https://letstalksexuality.com/fertility-signs/
https://letstalksexuality.com/fertility-signs-2/
https://letstalksexuality.com/changes-in-cervix-in-fertility-cycle/
https://letstalksexuality.com/fertility-cycle-changes-in-the-body/
https://letstalksexuality.com/menstruation-notes/
https://letstalksexuality.com/fertility-and-sexuality-awareness/

बाजारात अंडोत्सर्जनचा काळ ओळखण्यासाठी काही किट्सही (Ovulation Kit) मिळतात. त्याचाही वापर करु शकता.

आपले उत्तर प्रविष्ट करा

20 + 0 =