प्रश्नोत्तरेमुलीनीं हस्तमैथुन कशानी व कशाप्रकारे करावे?

1 उत्तर

हस्तमैथुनामध्ये मुलं किंवा मुली शरीराच्या संवेदनशील अवयवांना, लैंगिक अवयवांना स्पर्श करून आनंद मिळवतात. हस्तमैथुनामध्ये काहीही गैर नाही. उलट ही सर्वात सुरक्षित लैंगिक क्रिया आहे. मुलींच्या लैंगिक अवयवांमध्ये क्लिटोरिस नावाचा एक अवयव असतो. लघवीच्या किंवा शूच्या जागेच्या थोडा वर या अवयवाचं टोक असतं. याला हात लावला, इतर वस्तूंनी त्याला स्पर्श केला किंवा क्लिटोरिस घासलं गेलं तर लैंगिक उत्तेजना निर्माण होते आणि लैंगिक आनंद मिळतो. स्तनांना स्पर्श करून देखील आनंद मिळवता येतो. हस्तमैथुन करण्याच्या तुम्हाला आवडतील, आनंद मिळेल अशा पद्धती तुम्ही शोधू शकता.

हस्तमैथुन करत असताना स्वच्छतेची काळजी घेणं मात्र महत्वाचं आहे. कोणतीही काचेची, धारदार, अस्वच्छ किंवा लैंगिक अवयवांना हानी पोहचेल अशी वस्तू वापरू नका.

अधिक माहितीसाठी कृपया ‘लेख’, ‘FAQ – शंका समाधान’ तसेच ‘प्रश्नोत्तरे’ जरूर वाचा. तुम्हाला शोधणे सोपे जावे यासाठी लिंक देत आहे.

लेख- https://letstalksexuality.com/masterbation_safe_pleasurable/

‘FAQ – शंका समाधान’: https://letstalksexuality.com/frequently-asked-questions/

प्रश्नोत्तरे :- https://letstalksexuality.com/question/

आपले उत्तर प्रविष्ट करा

8 + 3 =