प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsयोनीमधे लिंग टाकल्यावर माझं वीर्य लगेच पडत
1 उत्तर

प्रश्न जर अधिक विस्तृतपणे मांडला असता तर जास्त अधिक माहिती देता येईल. खालील उत्तरामध्ये वेगवेगळ्या शक्यता गृहीत धरुन उत्तर लिहित आहे.

तुम्ही संभोगापूर्वी फोरप्ले(प्रत्यक्ष संभोगापूर्वी करायच्या लैंगिक कृती) करता की नाही? जर त्या करत नसाल तर आवर्जून करा. यामुळं लैंगिक उत्तेजना हळूहळू वाढत जाईल. किंवा जर तुम्ही फोरप्ले करत असाल तर त्यावेळी वीर्यपतन होतं का? जर होत असेल तर तुम्हाला लैंगिक भावनांवर नियंत्रण मिळवून संभोगाचा कालावधी वाढवता येईल. जर तुम्ही संभोगाची कृती नुकतीच करायला लागले असाल तर कदाचित सुरुवातीच्या काळामध्ये वीर्यपतन लवकर होवू शकतं.

कदाचित शिघ्रपतनाची समस्यादेखील असू शकेल. अशावेळी प्रत्यक्ष डॉक्टरांचा सल्ला जास्त फायदेशीर राहील. शीघ्रपतनाविषयी अधिक माहिती वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://letstalksexuality.com/premature-ejaculation/

https://letstalksexuality.com/early-ejaculation-start-stop/

आपले उत्तर प्रविष्ट करा

17 + 2 =