प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsरोज हस्तमेथून धोक्याचे आहे का? दिवसातुन किति वेळा करावे

1 उत्तर

कितीवेळा हस्तमैथुन करावे याचा काही नियम किंवा मापदंड नाही. हस्तमैथून केल्याने कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम होत नाहीत. उलटपक्षी हस्तमैथून ही एक नैसर्गिक क्रिया आहे व स्वतःला लैंगिक आनंद देण्यासाठी ही क्रिया सर्वात सुरक्षित क्रिया आहे. शिवाय हस्तमैथूनातून आपल्याला आपल्या शरीरातील कोणते भाग लैंगिक दृष्ट्या सर्वात जास्त संवेदनशील आहेत हे कळण्यासाठी देखील मदत मिळेल.

दुसरीकडे सतत हस्तमैथून करण्याची इच्छा निर्माण होणे हे देखील योग्य नाही. त्यामुळे आपल्या मनात लैंगिक क्रिया करण्याची इच्छा सतत येत राहण्याची शक्यता आहे व आपल्या भविष्यात त्याचे मानसिक दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे त्यामुळे तसे जर का होत असेल तर आपले लक्ष दुसऱ्या क्रियाशील कामांमध्ये घालण्याचा प्रयत्न करा. चांगले वाचन करा, जर आपण विद्यार्थी असाल तर अभ्यासात लक्ष केंद्रित करा, खेळांमध्ये लक्ष घालण्याचा प्रयत्न करा.

असं दिसून आलं आहे की ज्या व्यक्ती एकाकी आणि दुःखी असतात त्या जास्त प्रमाणावर हस्तमैथुन करतात. तुमच्या बाबत असं काही होत आहे का याकडे लक्ष द्या. एकाकीपणा घालवण्यासाठी बाहेर पडणं, इतरांना भेटणं गरजेचं आहे. दुःखाचं कारण शोधायचा प्रयत्न केलात तर त्यावरही काही मार्ग काढता येतील.

हस्तमैथुनातून आनंद मिळत असेल तर त्यात घातक काही नाही. त्यामुळे अपराधी वाटून घेऊ नका. मात्र हस्तमैथुन केल्याशिवाय किंवा दुसऱ्या कशानेच आनंद मिळत नाही अशी स्थिती येऊ देऊ नका.

आपल्या वेबसाईटवर हस्तमैथुनासंबंधी अनेक प्रश्न चर्चिले आहेत. अधिक माहितीसाठी कृपया ‘लेख’, ‘FAQ – शंका समाधान’ तसेच ‘प्रश्नोत्तरे’ जरूर वाचा. तुम्हाला शोधणे सोपे जावे यासाठी लिंक देत आहे.

लेख- https://letstalksexuality.com/masterbation_safe_pleasurable/

‘FAQ – शंका समाधान’: https://letstalksexuality.com/frequently-asked-questions/

प्रश्नोत्तरे :- https://letstalksexuality.com/question/

आपले उत्तर प्रविष्ट करा

8 + 6 =