लिंग ओला असेल आणि ते योनीत गेले तर गर्भवती होते का स्री

1,344
प्रश्नोत्तरेलिंग ओला असेल आणि ते योनीत गेले तर गर्भवती होते का स्री
Anonymous asked 4 years ago
1 Answers
let's talk sexuality answered 4 years ago

एका वीर्यस्खलनामध्ये लाखो पुरूषबीजं असतात. त्यातील गर्भधारणेसाठी एकच पुरेसं असतं. स्त्रीच्या पाळीचक्राच्या जननक्षम काळात म्हणजेच जेव्हा गर्भधारणा होऊ शकते अशा काळात जर गर्भनिरोधक न वापरता लैंगिक संबंध केले असतील तर गर्भधारणेची शक्यता असते. त्यामुळे स्त्रीच्या पाळीचक्राच्या जननक्षम काळात म्हणजेच जेव्हा गर्भधारणा होऊ शकते अशा काळात लिंग ओले असताना योनीत गेले अथवा संभोग केला तर गर्भधारणेची शक्यता नाकारता येत नाही.
स्त्रीच्या पाळीचक्राच्या जननक्षम काळ ओळखण्यासाठी  https://letstalksexuality.com/conception/  या लिंक वरील लेख नक्की वाचा.
नको असणारी गर्भाधारणा रोखण्यासाठी https://letstalksexuality.com/contraception/ या लिंक वरील लेख वाचा.