प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsलिंग पुरुषांचे

पुरुष जेव्हा त्याच्या आयुष्यात पहिल्यांदाच सेक्स करतो तेव्हा त्याचे लिंग वरील त्वचा जास्त का मागे जात नाही ती फक्त थोडी मागे जाते व लिंगा च्या आतील होल दिसते ती त्वचा मागे जाताना असे का बरे पहिल्यांदा सेक्स करीत असल्यामुळे होते का व हळूहळू जस जस संबंध पुरुष करील तसतशी ती त्वचा जास्त मागे जाते का त्याचप्रमाणे आम्हा स्त्रियांची जशी virginity असते तशी पुरुषांची पण असते का

1 उत्तर

लिंगाच्या टोकाला एक फुगीर भाग असतो ज्याला शिस्नमुंड म्हणतात. शिस्नमुन्डावर एक त्वचा असते. मुलगा तारुण्यात आल्यावर ही त्वचा हळूहळू मागे नेता येते. काही मुलांची शिस्नमुंडावरची त्वचा खूप आवळलेली/टाईट असते व मागे सरकवता येत नाही. याला ‘फायमॉसिस’ म्हणतात. फायमॉसिस असलेले पुरुष आपल्या जोडीदारासोबत जेव्हा सेक्स करायला जातात तेव्हा त्वचा मागे सरकायला त्रास होतो व खूप दुखतं. त्यामुळे संभोग करताना खूप त्रास होतो. आपल्याला अशी अडचण आहे का हे डॉक्टरांकडून तपासून घ्या. डॉक्टरांनी फायमॉसिसचं निदान केलं तर छोटीशी शस्त्रक्रिया करून शिस्नमुंडावरचं कातडं काढून टाकलं जातं. याला सुंता करणं म्हणतात. (सुंता बाबत अधिक माहितीसाठी https://letstalksexuality.com/male-circumcision/ ही लिंक पहा) सुंता केल्यानंतर शिस्नमुंड उघडं राहतं. सुंता केल्यानं लैंगिक सुखास बाधा येत नाही. योग्य त्या डॉक्टरांचा सल्ला घेणे जास्त योग्य.

राहिला प्रश्न virginity चा तर असं काही नसतं. ना महिलांसाठी ना पुरुषांसाठी!

virginity बाबतच्या अधिक माहितीसाठी https://letstalksexuality.com/some-misconceptions-about-sex/ ही लिंक पहा.

आपले उत्तर प्रविष्ट करा

3 + 19 =