प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsवीर्य योनीत गेल्यावर योनीतुन चिकट स्त्राव

वीर्य योनीत गेल्यावर योनीतुन चिकट स्त्राव बाहेर येतोय यामुळे गर्भधारण होण्यास काही अडचण येतेय का

1 उत्तर

सगळ्याच स्त्रियांना योनीमार्गात ओलसरपणा जाणवतो. योनीतून झिरपणाऱ्या पाण्याला योनिस्राव किंवा पांढरे पाणी असे म्हणतात. या पाण्यामुळे योनी स्वच्छ राहते. शारीरिक संबंध करत असताना योनीतुन चिकट स्त्राव बाहेर येतोय असं आपण सांगत आहात, त्यानुसार बाहेर येणारा स्त्राव हा योनीस्त्राव व आतमध्ये गेलेले वीर्य यांचा एकत्रित स्त्राव असावा असे जाणवत आहे. गर्भधारणेस यामुळे काही अडचण नाही येत. पण जर खूप दिवस प्रयत्न करुनही गर्भधारणा होत नसेल तर अवश्य डॉक्टराना भेटा

तसेच अंगावरून नैसर्गिकरीत्या जाणाऱ्या पांढऱ्या पाण्याचा रंग आणि वास बदलल्यास आजाराचे लक्षण समजून त्यावर उपचार घेतले पाहिजेत. स्वतःच्या नैसर्गिक स्त्रावाचा वास आपल्या परिचयाचा असतो. नेहमीपेक्षा वेगळा दुर्गंधीयुक्त वास असल्यास आजाराचे लक्षण समजून त्यावर उपचार केले पाहिजेत. याबाबत अधिक माहिती जाणून घ्यायची इच्छा असेल तर पुढील लिंक नक्की पाहा.

https://letstalksexuality.com/human-body-secretions/

https://letstalksexuality.com/conception/

आपले उत्तर प्रविष्ट करा

18 + 18 =