शिथील . वय 29 asked 7 years ago

कधिकधि मला सेक्स करायला गेल्यावर योनीत घुसवीण्या अगोदर शिथील होते .त्या रात्री परत ऊठत नाही .उपाय?

1 उत्तर

कधीकधीच असं होत असेल तर काळजी करण्याचं कारण नाही पण नेहमीच असे होत असेल तर मात्र त्यावर उपाय शोधायला लागेल.

संभोगादरम्यान वेळेआधीच लिंगातून वीर्य बाहेर येणे म्हणजे शीघ्रपतन. असं म्हणतात की साधारणतः संभोग 3-5 मिनिटे चालतो. अर्थात प्रत्येकासाठी हा काळ कमी जास्त असू शकतो. मात्र अपेक्षेपेक्षा कमी वेळात वीर्य बाहेर येत असेल तर दोन्ही जोडीदारांची निराशा होऊ शकते.

शीघ्रपतनाची अनेक कारणे आहेत. सेक्सविषयी भीती, अति आतुरता, कामाचा किंवा इतर प्रकारचा ताण, लैंगिक संबंधाचा आधीचा अनुभव फारसा आनंददायी नसेल तर त्यामुळेही शीघ्रपतन होऊ शकतं. काही वेळा काही शारीरिक आजारही कारणीभूत ठरतात. कधी कधी तर जोडीदाराविषयी आकर्षण आणि प्रेम नसेल तरी शीघ्रपतन होऊ शकतं.

शीघ्रपतन होऊ नये म्हणून सेक्सबद्दलची चिंता, दडपण दूर करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा उपयोग होईल. तसंच ऑरगॅझम कधी येतो, त्याआधी शरीरात, मनात काय संवेदना निर्माण होतात याचं निरीक्षण करा. त्या क्षणी समागमाचा वेग थोडा मंदावण्याचा प्रयत्न केला तर लवकर वीर्य बाहेर येणार नाही. यासाठी जोडीदाराचं सहकार्य आवश्यक आहे आणि मुख्य म्हणजे एकमेकांशी संवादही तितकाच महत्त्वाचा आहे.

वैद्यकीय मदत, सेक्सॉलॉजिस्टचा सल्ला आणि काही वेळा औषधांचा उपयोग होऊ शकतो. न घाबरता आणि न लाजता आपली समस्या डॉक्टरांना सांगा. दोन्ही जोडीदारांनी दोषारोप न करता एकमेकांना समजून घेतलं, सेक्स सोडून एरवीही जवळीक वाढवली, धीर दिला तर त्याचा परिणाम निश्चित चांगला होऊ शकेल.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटवरील शिघ्रपतान विषयीचा लेख वाचा. खाली लिंक्स दिल्या आहेत.

https://letstalksexuality.com/premature-ejaculation

https://letstalksexuality.com/early-ejaculation-start-stop/

आपले उत्तर प्रविष्ट करा

19 + 7 =