प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsशीघ्रपतन : माझे वय 30 वर्ष आहे, आणि मी विवाहित आहे, मला शिघ्रपातानाचा त्रास आहे, सेक्स सुरु केल्यावर लगेच पतन होते तर काय करू । यामुळे सेक्स करायलाही भीती वाटते आणि मनात तणाव येतो। त्यामुळे आनंदापेक्षा दुःखच वाटत , उपाय सांगावा । मी आधी खूप हस्तमैथुन केले आहे। मला वाटत त्याचा परिणाम असावा। व मनात सेक्सचे विचार भरपूर येतात। काय करावं समजत नाही

माझे वय 30 वर्ष आहे, आणि मी विवाहित आहे, मला शिघ्रपातानाचा त्रास आहे, सेक्स सुरु केल्यावर लगेच पतन होते तर काय करू । यामुळे सेक्स करायलाही भीती वाटते आणि मनात तणाव येतो। त्यामुळे आनंदापेक्षा दुःखच वाटत , उपाय सांगावा । मी आधी खूप हस्तमैथुन केले आहे। मला वाटत त्याचा परिणाम असावा। व मनात सेक्सचे विचार भरपूर येतात। काय करावं समजत नाही

1 उत्तर

तुम्ही तुमच्या भावना व्यक्त केल्याप्रमाणे भीती वाटणे, तणाव येणे आणि इतर नकारात्मक विचार मनात येणं आम्ही समजू शकतो. शीघ्रपतन ही बऱ्याच पुरुषांना भेडसावणारी समस्या आहे. साधारणतः संभोग 3-5 मिनिटे चालतो. अर्थात प्रत्येकासाठी हा काळ कमी जास्त असू शकतो. मात्र अपेक्षेपेक्षा कमी वेळात वीर्य बाहेर येत असेल तर दोन्ही जोडीदारांची निराशा होऊ शकते व याचा परिणाम व्यक्तिगत आयुष्यावर किंवा एकूणच नातेसंबंधांवर होऊ शकतो. असे असले तरी यातून बाहेर येण्याचे मार्ग देखील आहेत.

एक गोष्ट जाणीवपूर्वक सांगावीशी वाटते की हस्तमैथुन आणि शीघ्रपतन याचा काहीही संबंध नाही. हस्तमैथुन ही एक नैसर्गिक प्रक्रिया असून त्यामुळे कोणताही धोका नसतो. शीघ्रपतन हे कोणत्याही वयात होऊ शकते.

शीघ्रपतन म्हणजे काय हे जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://letstalksexuality.com/premature-ejaculation/.

शीघ्रपतनावर उपाय म्हणून वापरल्या जाणाऱ्या स्टार्ट-स्टॉप पध्दतीबद्दल माहिती देणारा लेख खालील लिंकवर उपलब्ध आहे.

https://letstalksexuality.com/early-ejaculation-start-stop/

आपले उत्तर प्रविष्ट करा

18 + 18 =