काळजी करू नका. लिंगाचा आकार केवढा असावा याचा काही विशिष्ट मापदंड नाही. प्रत्येक पुरुषाच्या उत्तेजित लिंगाची लांबी आणि जाडी वेगवेगळी असते. उदा. काहींचं ४ इंच, काहींचं ५ इंच तर काहींचं ६ इंच. साधारणपणे लिंग ताठ झाल्यावर त्याची लांबी ७ ते १७ (४-५ इंच) सेंटीमीटर एवढी असू शकते. लिंग किती मोठं आहे यापेक्षा ते ताठ होतं का, संबंधाच्या वेळी ते ताठ राहतं का किंवा लैंगिक सुख मिळतं का, तुमच्या जोडीदाराला तुम्ही लैंगिक सुख मिळवून देऊ शकता का हे जास्त महत्त्वाचं आहे.
तसेच लिंगाचा आकार, लांबी आणि सेक्स याचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. अनेक पुरुषांमध्ये आपल्या लिंगाची लांबी पुरेशी आहे का? आपण जोडीदाराला पूर्ण लैंगिक सुख देऊ शकतो का? याविषयी असुरक्षितता असते. बहुतेक वेळा मर्दानगी आणि जोडीदाराचे समाधान करण्याची क्षमता यांचा संबध लिंगाचा आकार आणि लांबी यांच्याशी लावतात. पण हा गैरसमज आहे. सेक्समध्ये लिंगाचा आकार नाही तर आनंद महत्वाचा असतो. सेक्समध्ये प्रत्यक्ष संभोगाबरोबरच प्रणय, स्पर्श, शारीरिक जवळीक आणि संभोग अशा विविध प्रकारच्या लैंगिक क्रियांचा समावेश होतो. यातून जोडीदार परस्परांना आनंद देऊ शकतात. लिंगाच्या आकाराविषयी अधिक माहितीसाठी खालील लिंकवर भेट द्या.
https://letstalksexuality.com/penis-size-doesnot-matter-in-sexual-satisfaction/
‘FAQ – शंका समाधान’: https://letstalksexuality.com/frequently-asked-questions/
प्रश्नोत्तरे :- https://letstalksexuality.com/question/