प्रश्नोत्तरेहस्तमैथुन करताना वीर्य 1 मिनिटात बाहेर पडते,मला अजून पर्यंत सेक्स चा अनुभव नाहीये. सेक्स करताना पण असच लवकर वीर्य बाहेर येईल म?जर तस झालं तर लग्नानंतर मी माझ्या पार्टनरला कस लैंगिक सुख देऊ शकेल खूप डिस्टर्ब होतेय काहीतरी उपाय सांगा?

2 उत्तर

हस्तमैथुन करताना लवकर वीर्यपतन होते म्हणजे संभोगावेळी होईलच हे मनातून काढून टाका. आणि समजा झालेच लवकर वीर्यपतन तर ठीक आहे. होतं असं आणि यावर उपायही शोधता येतो. पहिल्यांदा सेक्स करताना तुम्हाला किंवा जोडीदाराला लैंगिक सुख मिळालेच पाहिजे हा आग्रह कशासाठी ? होईल ना हळूहळू सगळं सुरळीत. त्याचा मनावर दबाव ठेवू नका किंवा स्वतःला अपराधी वाटून घेऊ नका. जशी तुमच्या मनात काही भीती आहे तशी तुमच्या जोडीदाराच्या मनात असेलच की. मोकळेपणाने एकमेकांशी संवाद साधा.

सगळ्यात महत्वाचं म्हणजे टेन्शन घेऊ नका. निश्चिंत राहा. टेन्शन घेऊन तुमचा प्रश्न सुटणार तर नाहीच पण अधिक गुंतागुंतीच्यचा होण्याची शक्यता आहे. तरूणपणी जेव्हा लैंगिक संबंधांचा अनुभव नसतो तेव्हा आपल्याला ‘सगळं’ जमेल ना या चिंतेमुळे शीघ्रपतन होऊ शकतं. अधिक माहितीसाठी https://letstalksexuality.com/premature-ejaculation/ हा लेख तसेच आपल्या वेबसाईटवरील या समस्येसंबंधित प्रश्न उत्तरे नक्की वाचा.

संभोगाच्या काही पध्दती बदलून शीघ्रपतनाची समस्या दूर केली जाऊ शकते. याबद्दल अधिक माहिती वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://letstalksexuality.com/early-ejaculation-start-stop/

पहिला वाहिला सेक्स करताना काय काळजी घ्यावी याविषयीचे अनेक प्रश्न आपल्या वेबसाईटवर चर्चिले आहेत ते वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

आपले उत्तर प्रविष्ट करा

10 + 0 =